Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरुची अडारकरबरोबर लग्न केल्यानंतर पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला "चांगल्या आणि वाईट काळात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 14:48 IST

सुरुचीबरोबर लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर पियुषने प्रतिक्रिया दिली आहे.

'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडेशी गुपचूप लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सुरुचीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. सुरुची आणि पियुषच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सुरुची आणि पियुषने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुचीबरोबर लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर पियुषने प्रतिक्रिया दिली आहे.

 तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्यानंतर पियुषने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "चांगल्या आणि वाईट काळात तुमच्याबरोबर असलेले कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार तुम्हाला सगळ्यांबरोबर संवाद साधण्याची अनुमती देतात. आणि तुम्ही सांगू शकता की, ते तुमच्यासाठी आनंदी आहेत."

पियुष रानडे आणि सुरुची यांनी अंजली मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्याचदरम्यान त्यांची जवळीक वाढली. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न शाल्मली तोळेबरोबर झालं होतं. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने अभिनेत्री मयुरी वाघबरोबर लग्नगाठ बांधली होती. पण, हे लग्नही फार काळ टिकलं नाही.  

टॅग्स :सुरुची आडारकरपियुष रानडेटिव्ही कलाकार