Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘देवमाणूस’मधील ही नवी अभिनेत्री दिसते लय भारी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 11:44 IST

1 / 9
‘देवमाणूस’ ही मालिका लवकरच निरोप घेणार अशी चर्चा आहे पण आता मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
2 / 9
ती डॉक्टरकडे चेकपसाठी आली आहे. डॉक्टरचा व्हिडीओ टीव्हीवर पाहून ती इथवर आल्याचे तिने सांगितलेले. ही नवी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर तिचे नाव संजना काळे.
3 / 9
संजना ही उत्तम अभिनेत्रीसोबत डान्सर आणि कोरिओग्राफर आहे.
4 / 9
बाळुमामाच्या नावानं चांगभलं, सप्तपदी या मालिकेत संजना दिसली होती.
5 / 9
याशिवाय तिने गेट टू गेदर या चित्रपटातही महत्वाची भूमिका बजावली आहे.
6 / 9
देवमाणूस मालिकेमुळे आता ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
7 / 9
संजनाच्या एण्ट्रीमुळे मालिकेत आता आणखी एक ट्विस्ट आला आहे.
8 / 9
आता तिला देखील डॉक्टर आपल्या सापळ्यात अडकवून लुटणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
9 / 9
संजना सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे इन्स्टा अकाऊंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनझी मराठी