‘पुष्पा’पासून ‘मास्टर’पर्यंत...,साऊथच्या या सिनेमांनी बॉलिवूडलाही फोडला घाम ...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 14:22 IST
1 / 8‘पुष्पा’ या नुकत्याच रिलीज झालेल्या साऊथच्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर किती कल्ला केला, हे आपण पाहतोच आहे. यावर्षी असेच अनेक साऊथचे सिनेमे रिलीज झाले. या सिनेमांनी बॉलिवूडच्या सिनेमांना अक्षरश: घाम फोडला.2 / 8साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी अशा पाच भाषांमध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ने 13 दिवसांत देशभरात 201.50 कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कमाईचा हा वेग बघता, लवकरच हा सिनेमा 250 कोटींचा पल्ला गाठेल, असं मानलं जात आहे. 3 / 8‘जय भीम’हा तमिळनाडूच्या आदिवासी समाजावर बनलेला चित्रपट आहे आणि या सिनेमाचं इतकं कौतुक झालं की, बॉलिवूडकरांनाही काही काळ हेवा वाटवा. 4 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार सूर्याने न्यायमूर्ती चंद्रूची भूमिका साकारली. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमाने बजेटपेक्षा कितीतरी अधिक कमाई केली. शिवाय या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपटाचा मानही मिळवला.4 / 8 साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचे सिनेमे त्यांच्या नावावर चालतात. ‘अन्नाथे’ हा यावर्षी रिलीज झाला आणि या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली. या भाऊ-बहिणीचे नाते दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात रजनीकांतशिवाय किर्मी सुरेश मुख्य भूमिकेत होती.5 / 8 ‘मास्टर’ हा सुपरस्टार विजय सेतुपतीचा क्राइम ड्रामा चित्रपटही तुफान चालला. विजय सेतुपती यात एका मद्यपी प्राध्यापकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 135 कोटींची कमाई केली होती. जगभरात या सिनेमाने 300 कोटींचा गल्ला जमवला.6 / 8 अभिनेता पवन कल्याणने ‘वकील साब’मधून कमबॅक केलं अन् प्रेक्षकांच्या या चित्रपटावर अक्षरश: उड्या पडल्या. अमिताभ बच्चन, तापसी पन्नूच्या ‘पिंक’ या चित्रपटाचा हा रिमेक. पण पवन कल्याणच्या अभिनयाने पुन्हा एकदा लोकांना थिएटरमध्ये खेचून आणलं. या चित्रपटाने 90 कोटींची कमाई केली.7 / 8नागा चैतन्य व साई पल्लवीचा ‘लव्ह स्टोरी’ हा एक रोमँटिक सिनेमा आला आणि गाजला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर 50 कोटींहून अधिक कमाई केली.8 / 8द गे्रट इंडियन किचन हा मल्याळम सिनेमा. या वर्षातला हा सिनेमा पाहिला नसेल तर हे वर्ष व्यर्थ आहे. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं. सोशल मीडियावरही या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली, अगदी बॉलिवूडकरांना हेवा वाटावी इतकी.