Year End 2024: किरण राव ते पायल कपाडिया; 'या' महिला दिग्दर्शिका, निर्मात्यांनी गाजवलं हे वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:36 IST
1 / 5ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा (Guneet Monga) यंदाही ऑस्करच्या स्पर्धेत आहेत. त्यांची 'अनुजा' ही श़ॉर्ट फिल्म शॉर्टलिस्टेड झाली आहे. गारमेंट क्षेत्रातील बालकामगारावर याची कथा आधारित आहे. गुनीत मोंगा यांना गेल्या वर्षीच 'द एलिफंट व्हिस्परर्स' साठी ऑस्कर मिळाला होता.2 / 5याशिवाय ऑस्करसाठी भारताकडून 'लापता लेडीज' हा सिनेमा पाठवण्यात आला होता. किरण रावने (Kiran Rao) सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. अगदी हलकीफुलकी पण मनाला भावणारी सिनेमाची कथा आहे. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर सिनेमाने धुमाकूळ घातला होता. 3 / 5दिग्दर्शिका, निर्माती एकता कपूरने (Ekta Kapoor) यावर्षात 'द बर्किंगघम मर्डर्स', 'द साबरमती रिपोर्ट' सारखे सिनेमे दिले ज्याने प्रेक्षकांवर छाप पाडली.4 / 5अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) 'दो पत्ती' हा तिचा केला जो तिचा निर्माती म्हणून पहिलाच सिनेमा आहे. घरगुती हिंसाचाराची कथा यामध्ये दाखवण्यात आली. काजोलचीही सिनेमात मुख्य भूमिका होती.5 / 5दिग्दर्शिका पायल कपाडियाच्या (Payal Kapadia)'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' या सिनेमाचीही यावर्षी जगभरात जोरदार चर्चा झाली. कान्समध्ये सिनेमाने ग्रँड प्रिक्स जिंकलं तर गोल्डन ग्लोबमध्ये सिनेमाला नॉमिनेशन मिळालं. मुंबईत प्रेम आणि एकटेपणा अनुभवणाऱ्या तीन महिलांची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली.