Rekha : रेखा कांजीवरम साडीच का नेसतात...? स्वत: सांगितलं सीक्रेट, ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 08:00 IST
1 / 9आपल्या अभिनयाने आणि अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha ) यांचं आयुष्य म्हणजे एक आख्यायिका म्हणायला हरकत नाही.2 / 9रेखांच्या अभिनयाची जितकी चर्चा झाली,तितकीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा झाली. पण आजतागायत रेखा नावाचं कोडं कुणालाच पूर्णपणे उलगडलेलं नाही. 3 / 9 अभिनय अदा आणि सौंदर्यांने त्यांनी सर्वांनाच भूरळ पाडली. आजही त्यांच्या सौंदर्यावर अख्खं जग फिदा आहे. त्यांचा पेहरावही डोळ्यांत भरतो.4 / 9भरजरी कांजीवरम साड्या, त्यावर शोभतील असे पारंपरिक दागिने, मोकळे केस अशा रेखा प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधून घेतात. रेखा दरवेळी इतक्या सुंदर कांजीवरम साड्या आणतात कुठून, असा प्रश्न अनेकांना पडतो.5 / 9आता रेखा यांनी स्वत:च या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. नेहमी कांजीवरम साड्या नेसण्यामागचं सीक्रेट त्यांनी सांगितलं आहे. एका पुरस्कार सोहळ्यात त्या यावर बोलल्या.6 / 9त्या म्हणाल्या, खरं तर मी जिथे जाईल तिथे हा प्रश्न कायम मला विचारला जातो. तू नेहमीच साडी आणि त्यातही कांजीवरमच साडी का नेसतेस? असं लोक मला विचारतात. आज मी यामागचं सीक्रेट सांगणार आहे.7 / 9पुढे त्या म्हणाल्या, तसं हे काही फार खाजगी सीक्रेट नाही. माझ्या मते, स्टायलिस्ट रहाणं, दिसणं म्हणजे फक्त हटके काहीतरी घालणं असं नसतं. आपला पारंपरिक पेहरावही आपल्याला स्टायलिश बनवू शकतो.8 / 9मी कायम साड्या नेसते, त्यातही कांजीवरम साड्या नेसते, कारण ही माझी परंपरा आहे. साडी मला माझ्या आईची, तिच्या उबदार प्रेमाची आठवण करून देते, असं त्या म्हणाल्या.9 / 9पुढे त्या म्हणाल्या, मी कांजीवरम साडीच का नेसते असं विचाराल तर मला वाटतं यात खूप सारं प्रेम,सुरक्षेची भावना आणि खूप साऱ्या प्रेमाची ऊब दडलेली आहे. ही साडी नेसले की माझी आई माझ्यासोबत आहे,असं मला वाटतं आणि यासाठी मी माझ्या अम्माचे आभार मानते.