Kanatara : ‘कांतारा’ची ‘लीला’ रिअल लाईफमध्ये आहे प्रचंड ग्लॅमरस, अभिनेत्री सप्तमी गौडाचे फोटो पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 12:28 IST
1 / 9सध्या सिनेप्रेमींच्या ओठांवर एकच नाव आहे, ते म्हणजे कांतारा. होय, ‘कांतारा’ या चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची अनोखी स्टोरी, डायरेक्शन, स्टारकास्ट सगळंच काही मस्त जमून आलं आहे. ‘कांतारा’चा हिरो व डायरेक्टर ऋषभ शेट्टी याची चर्चा आहेच. पण ‘कांतारा’ची हिरोईन सप्तमी गौडा हिची चर्चाही कमी नाही.2 / 9सप्तमी गौडा ‘कांतारा’ एक नॉन ग्लॅमरस भूमिकेत आहे. तिने लीलाची भूमिका साकारली आहे. पण रिअल लाईफमध्ये ही लीला प्रचंड ग्लॅमरस आहे.3 / 9सप्तमी गौडा कन्नड फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीत येऊन तिला फक्त दोनच वर्ष झालीत. पण या दोन वर्षात तिने जबरदस्त काम केलं आहे.4 / 98 जून 1996 रोजी जन्मलेली सप्तमी 27 वर्षांची आहे. बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या सप्तमीचे वडिल असिस्टंट पोलिस कमिशनर आहेत.5 / 9सप्तमीने बेंगळुरूमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि मी सिव्हील इंजिनिअरिंग करण्यासाठी कॉलेजात प्रवेश घेतला. पण आता ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.6 / 9सप्तमी अभ्यासात हुशार आहेच. तिची अॅक्टिंगही तुम्ही पाहिली आहे. याशिवाय ती नॅशनल स्वीमरही आहे.7 / 92020 साली तिने कन्नड फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केला. पॉपकॉर्न मंकी टायगर हा तिचा पहिला सिनेमा होता.8 / 9सप्तमी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती रोज नवे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.9 / 9‘कांतारा’ या चित्रपटानंतर तिचे फॉलोअर्स वाढले आहेत. या चित्रपटाने सप्तमीला एका रात्रीत स्टार बनवलं. हा सिनेमा तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला.