Join us  

'बालिका वधू' मधील आनंदीची आई आता कुठे आहे गायब? अभिनय सोडण्यामागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 4:04 PM

1 / 8
टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'बालिका वधू' आठवत असेलच. यातील मां सा, आनंदी, जग्ग्या, सुगना या पात्रांनी लक्ष वेधलं होतं. अभिनेत्री अविका गौरला तर आजही आनंदी म्हणूनच लोक ओळखतात.
2 / 8
मालिकेत आनंदीच्या आईच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री आठवतेय का? भगवतीची असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. अभिनेत्री भैरवी रायचूराने (Bhairavi Raichura) ही भूमिका साकारली होती. भैरवीने बालिका वधू पूर्वीही अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं पण आनंदीची आई म्हणून तिला जास्त लोकप्रियता मिळाली.
3 / 8
भैरवी रायचूरा सध्या कुठे असते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. बऱ्याच काळापासून ती स्क्रीनवरुन गायब आहे. सध्या ती कुठे असते, काय करते याची माहिती समोर आली आहे.
4 / 8
भैरवीने जवळपास १४ वर्षांपूर्वीच इंडस्ट्रीला रामराम केला. 'हम पांच' मालिकेतून तिने करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत तिने साकारलेल्या काजल माथुर या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. यानंतर ती 'कृष्णा','एक राजा एक रानी','वो रहने वाली महलो की','अस्तित्व','बालिका वधू' या मालिकांमध्ये दिसली.
5 / 8
'बालिका वधू' नंतर भैरवीने 'ससुराल गेंदा फुल' मालिकेतही काम केलं. यामध्येही तिचं काम प्रेक्षकांना आवडलं. २०१० मध्ये ही मालिका संपल्यानंतर भैरवी स्क्रीनपासून दूर गेली.
6 / 8
भैरवी रायचुरा आता निर्माती आहे. तिने काही ओटीटी शो आणि टीव्ही मालिका निर्मित केल्या आहेत. तिला पहिल्यापासूनच निर्माती व्हायचे होते. अभिनयाच्या करिअरमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच निर्माती होण्याचा तिचा निर्णय खूपच धाडसी होता.
7 / 8
टीव्ही मालिकांमध्ये काम करायचं म्हणजे कमिटमेंट आणि तेवढा वेळ गुंतवावा लागतो. तिच्यासाठी हे शक्य नव्हतं. म्हणून तिने अभिनयाला रामराम केला.
8 / 8
भैरवीने प्रसिद्ध टीव्ही निर्माती नंदिता मेहरासोबत मिळून नवीन प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. दोघांनी मिळून 'बारिश','पवित्र रिश्ता' सारखे शो प्रोड्युस केले आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनअविका गौरसेलिब्रिटी