Join us

"मी मॉमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी तयार नव्हते"; श्वेताची लेक पलक तिवारीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:20 IST

1 / 10
पलक तिवारी ही श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. २००० साली पलकचा जन्म झाला आणि २०१२ मध्ये तिचा आई-वडिलांचा घटस्फोट झाला.
2 / 10
श्वेता तिवारीने त्यानंतर २०१३ मध्ये अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला, रेयांश असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. मात्र २०१९ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.
3 / 10
जेव्हा श्वेता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होती तेव्हा पलक १५ वर्षांची होती. जेव्हा तिच्या आईने तिला याबाबत सांगितलं. तेव्हा ती या सर्व गोष्टींसाठी तयार नव्हती.
4 / 10
पलकने फिल्म कंपॅनियनलला दिलेल्या माहितीनुसार, 'मी मॉमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी तयार नव्हते. माझ्यामध्ये आणि आईमध्ये काहीतरी कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते तुटलं असं मला वाटलं.'
5 / 10
जेव्हा श्वेता तिवारीने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं सांगितलं तेव्हा पलक खूप अस्वस्थ झाली होती.
6 / 10
पलकने या गोष्टीसाठी नकार दिला. त्यावर श्वेताला धक्काच बसला. तुझी ओव्हरएक्टिंग बंद कर असं तिने आपल्या लेकीला सांगितलं होतं.
7 / 10
श्वेता तिवारी सिंगल मदर आहे. ती एकटीच आता मुलगी पलक आणि मुलगा रेयांश यांचा सांभाळ करत आहे.
8 / 10
पलक आणि रेयांश यांच्या वयामध्ये १६ वर्षांचं अंतर आहे. पलक २४ वर्षांची आहे आणि रेयांश अवघ्या आठ वर्षांचा आहे.
9 / 10
श्वेता आणि पलक तिवारी दोघीही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.
10 / 10
टॅग्स :पलक तिवारीश्वेता तिवारीटिव्ही कलाकार