जेव्हा करिश्मा कपूरच्या बेडरूमध्ये घुसला होता चोर, वेळीच लक्ष गेले नसते तर घडली असती मोठी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 13:09 IST
1 / 10लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणे बंद केले होते आणि संसारात रमली. मात्र काही वर्षानतर पती संजय कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची तयारी केली होती. मात्र करिश्माला पाहिजे तसे यश मिळू शकले नाही. 2 / 10चित्रपटात करिश्माचे दर्शन घडत नसले तरीही सोशल मीडियावर ती प्रचंड एक्टीव्ह असते.3 / 10तिच्या सिनेमापेक्षा खाजगी आयुष्यावरच जास्त चर्चा रंगातात. वृत्तानुसार, एकदा करिश्मा घरी एकटी होती, घरात काही काम होते म्हणून कारपेंटला घरी बोलावले होते. 4 / 10काम करत असताना कारपेंटरला लक्षात आले करिश्मा घरात एकटी आहे आणि त्याचा फायदा घेत कारपेंटर तिच्या बेडरूममध्ये गेला. 5 / 10बेडरूमध्ये काही मौल्यवान सामानही होते. त्या कारपेंटरने त्यावेळी करिश्माचे पर्स चोरली आणि तिथून पळ काढला. 6 / 10 तिच्या उपस्थितीत घरात चोरी झाल्याचे करिश्माच्या लक्षात आले आणि काय करावे तिला सुचेनासेच झाले होते. 7 / 10तातडीने करिश्माने चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि पोलिसांनी चोराला पकडत चोरीला गेलेली पर्सही करिश्माला परत मिळवून दिली होती.8 / 10करिश्मा कपूर एकटीने तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.वेगवेगळ्या ब्रँडमध्येही करिश्माने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळते. 9 / 10पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मिळालेल्या पोटगीच्या रकमेतूनही ती आजही आलिशान आयुष्य जगते.10 / 102016 मध्ये करिश्मा व संजय कपूरचा घटस्फोट झाला. यासाठी तिला बरीच मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली होती.