Join us
Daily Top 2Weekly Top 5

IN PICS : कतरिना चिडली अन् ‘दाजीं’चे 1 कोटी वाचले..., विकी कौशलने सांगितला लग्नाचा धम्माल किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 11:54 IST

1 / 11
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ कालपरवाच हॉलिडे ट्रिपसाठी परदेशी रवाना झालेत. गेल्यावर्षी 9 डिसेंबरला कॅट व विकीनं मोठ्या थाटामाटात लग्न केलं. अर्थात ही एक प्रायव्हेट सेरेमनी होती.
2 / 11
पण आताश: विकी व कॅटच्या या प्रायव्हेट सेरेमनीचा एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. हा किस्सा वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
3 / 11
विकी व कॅटच्या लग्नाबद्दल बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. अगदी बॉलिवूडच्या मोजक्याच लोकांना या लग्नाचं निमंत्रण होतं. आता या लग्नाचा एक किस्सा स्वत: विकीने सांगितला आहे.
4 / 11
होय, ‘कपिल शर्मा शो’मध्ये खुद्द विकी कौशलने याबद्दलचा खुलासा केला. लग्नात बूट लपवण्याच्या खेळात विकीने कतरिनाच्या बहिणींना म्हणजे मेव्हण्यांना काय दिलं असा प्रश्न विचारल्यानंतर विकीने लग्नातला धम्माल किस्सा शेअर केला.
5 / 11
विकी कौशलने लग्नात कतरिनाच्या सहा बहिणींना लपवलेले बूट देण्याच्या बदल्यात 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम दिल्याचं बोललं गेलं होतं. याची खमंग चर्चा रंगली होती.
6 / 11
पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, खरंच विकीने कॅटच्या बहिणींना 1 कोटी रूपये दिले होते का? याचा खुलासा आत्ता कुठे झाला आहे.
7 / 11
लग्नात बूट लपवण्याच्या खेळात विकीने कतरिनाच्या बहिणींना काय दिलं असा प्रश्न कपिल शर्माने विचारला. यावर विकीने लग्नातला धम्माल किस्सा शेअर केला.
8 / 11
त्याने सांगितलं, ‘दुपारी आमची सप्तपदी झाली. कतरिनाच्या बहिणी माझे बूट लपवण्यासाठी तयारीत होत्याच. पण माझे माझे चंदीगढमधून आलेले भाऊ त्यांना असं करू देणार नव्हतेच. ते सुद्धा तयारीत होते. पण सप्तपदी सुरू झालीच आणि माझ्या भावांना चकमा देत कतरिनाच्या बहिणींनी माझे बूट लपवलेच.
9 / 11
पुढे विकी म्हणाला, सप्तपदी झाल्यानंतर कतरिनाला लगेचच सनलाइटमध्ये फोटोसेशन करायचं होतं. त्यामुळे ती म्हणाली, चला लवकर फोटो काढू नाहीतर सूर्यप्रकाश जाईल. मला फोटो काढायचे आहेत...
10 / 11
पुढे तो म्हणाला, कतरिनाने असं म्हटल्यानंतर मी ताडकन् उभा राहिलो, पण माझे बूट तिथे नव्हते. बूट कॅटच्या बहिणींकडे होते. साहजिकच, आता ते मिळवण्याच्या बदल्यात पैसे द्यावे लागणार होते. पण ती वेळ आलीच नाही...
11 / 11
कारण सनलाइटच्या गोंधळात कतरिनाच तिच्या बहिणींवर चिडली त्याचे बूट परत द्या, म्हणून ओरडली. बायकोच स्वत:च तिच्या बहिणींवर भडकल्याने मी सूटलो. मला काहीच पैसे द्यावे लागले नाही आणि माझे बूट मला परत मिळाले...., असं विकी म्हणाला आणि सगळे हसायला लागले....
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ