Join us

सिंहासन, विकी कौशलचा रुद्रावतार अन्...;'छावा'च्या सेटवरील अंगावर काटा आणणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:10 IST

1 / 10
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत विकी कौशलचा 'छावा' सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
2 / 10
या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत आहे.
3 / 10
'छावा' सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. आता सिनेमाच्या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत.
4 / 10
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून, राज्याभिषेक आणि त्यानंतर औरंगजेबाने कैद केल्यापर्यंतचा इतिहास फोटोस्टोरीतून दाखवला गेला आहे.
5 / 10
या फोटोंमध्ये विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे.
6 / 10
सिनेमाच्या सेटवरील हा फोटो पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
7 / 10
'छावा' सिनेमात अक्षय खन्ना खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात तो औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
8 / 10
'छावा' सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केलं आहे. तर मॅडॉक फिल्म्सची निर्मिती आहे.
9 / 10
हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
10 / 10
संतोष जुवेकर, सुव्रत जोशी या मराठी कलाकारांचीही सिनेमात वर्णी लागली आहे.
टॅग्स :विकी कौशलरश्मिका मंदानाछत्रपती संभाजी महाराज