By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 10:44 IST
1 / 9टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने तिच्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानीला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे सांगितले होते. राहुल अडीच वर्षांपासून त्रास देत असल्याचे वैशालीने लिहिले होते. तो तिचा मानसिक छळ करत होता. वैशालीचे लग्न मोडण्यातही राहुलचा हात असल्याचे सांगण्यात आले. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 9 वैशालीचा मृत्यू झाल्यापासून राहुल फरार असल्याचे सांगण्यात आले. वैशालीच्या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनीही तपास करून राहुलचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी सापळा रचून १९ ऑक्टोबरला राहुलच्या मुसक्या आवळल्या. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 9टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणातील आरोपी राहुल नवलानीला इंदूर पोलिसांनी कोर्टात हजर केले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना राहुल नवलानीला ऑनलाइन कोर्टात हजर करायचे होते. (फोटो इन्स्टाग्राम) 4 / 9यासाठी जयश्री आर्यमन मेहरा यांच्या कोर्टातून पोलिसांना फटकारलेही होते. यानंतर पोलिसांनी घाईघाईने राहुल नवलानीला दहा मिनिटांत न्यायालयात हजर केले. (फोटो इन्स्टाग्राम) 5 / 9 पोलिसांनी न्यायालयाकडे 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावत केवळ चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. (फोटो इन्स्टाग्राम) 6 / 9राहुल नवलानीला इंदूरमधूनच अटक करण्यात आली होती. इंदूरचे पोलिस आयुक्त हरी नारायण चारी मिश्रा यांनी ही माहिती दिली.(फोटो इन्स्टाग्राम) 7 / 9वैशालीने इंदूरमधील राहत्या घरी 15 ऑक्टोबर गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. वैशालीच्या जाण्याने तिच्या जवळच्या मैत्रिणींना धक्का बसला आहे.(फोटो इन्स्टाग्राम) 8 / 9वैशाली ठक्करने स्टार प्लसवरील शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये वैशालीने संजनाची भूमिका साकारली होती. (फोटो इन्स्टाग्राम) 9 / 9 यानंतर वैशाली 'ये वादा रहा', 'ये है आशिकी', 'ससुराल सिमर का', 'सुपर सिस्टर', 'लाल इश्क' आणि 'विष-अमृत' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. (फोटो इन्स्टाग्राम)