Join us

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा बाथरुम Video जाणूनबुजून लीक; अभिनेत्रीने केलं कबूल, कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:29 IST

1 / 12
उर्वशी रौतेला चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. जून २०२४ मध्ये, अभिनेत्रीचा प्रायव्हेट बाथरुम व्हिडीओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर उर्वशी रौतेला वादात सापडली.
2 / 12
उर्वशीचे तिच्या मॅनेजरसोबतचे फोन कॉल रेकॉर्डिंगही ऑनलाइन लीक झाले होते. नंतर हे उघड झालं की, हा फक्त एक प्रसिद्धी स्टंट होता आणि लीक झालेला बाथरूम सीन तिच्या 'घुसपैठिया' चित्रपटातील आहे. आता एका मुलाखतीत तिने या संपूर्ण प्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे.
3 / 12
उर्वशीचे तिच्या मॅनेजरसोबतचे फोन कॉल रेकॉर्डिंगही ऑनलाइन लीक झाले होते. नंतर हे उघड झालं की, हा फक्त एक प्रसिद्धी स्टंट होता आणि लीक झालेला बाथरूम सीन तिच्या 'घुसपैठिया' चित्रपटातील आहे. आता एका मुलाखतीत तिने या संपूर्ण प्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे.
4 / 12
उर्वशीने दावा केला की, निर्मात्यांनी तिच्याकडून आधीच परवानगी घेतली होती त्यामुळे व्हिडीओ जाणूनबुजून लीक करण्यात आला. तिच्या या प्रतिक्रियेनंतर अनेकांना धक्का बसला आहे.
5 / 12
वादग्रस्त प्रमोशनल स्टंटमागील कारण सांगताना, उर्वशी म्हणाली की, निर्मात्यांनी रडत रडत तिच्याशी संपर्क केला होता. ते कर्जबाजारी होते. तसेच ते त्यांनी जमीन विकणार होते. सॉल्यूशन म्हणून तिने या पर्यायाचा अवलंब केला.
6 / 12
मुलींना सावधगिरी बाळगण्याची जाणीव करून देण्यासाठी हे सर्व करण्यात आलं आहे असा दावाही तिने केला आहे. बॉलिवूड बबलशी बोलताना उर्वशी रौतेलाने खुलासा केला आहे.
7 / 12
'त्यांच्यावर काही कर्ज होतं आणि काही उधारीही होती. त्यांना त्यांची जमीन आणि सर्वकाही सोडावं लागलं. तो रस्त्यावर येणार होते आणि म्हणून ते आले आणि माझ्या बिझनेस मॅनेजरशी, प्रमुखांशी आणि सर्वांशी चर्चा केली.'
8 / 12
'आणि मग त्यांनी चित्रपटात एक सीन करण्यासाठी आमची परवानगी घेतली, आम्ही काहीही विशेष केलं नव्हतं. चित्रपटातला तो माझा एक चांगला सीन आहे. म्हणून त्या निर्मात्यांनी विनंती केली की, आपण तो सीन आधी लीकआऊट करू शकतो का?'
9 / 12
'मुलींनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे ही एक प्रकारची जाणीव देखील होती. त्यांचा उद्देश विशेषतः मुलींमध्ये सावधगिरी बाळगण्याची जाणीव निर्माण करणं हा होता' असं उर्वशीने म्हटलं आहे.
10 / 12
सुसी गणेशन लिखित आणि दिग्दर्शित 'घुसपैठिया' हा क्राइम ड्रामा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यात उर्वशी रौतेलासोबत विनीत कुमार सिंह, गोविंद नामदेव आणि अक्षय ओबेरॉय यांनी भूमिका साकारल्या आहेत.
11 / 12
उर्वशी रौतेलाचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
12 / 12
टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूड