1 / 7टीव्ही अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हिनाने बुधवारी(४ जून) रॉकीसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. 2 / 7सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. तिच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.3 / 7लग्नासाठी हिनाने डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. आता तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. 4 / 7हिनाने हातावर रॉकीच्या नावाची मेहेंदी काढली. अगदी सिंपल पण सुंदर मेहेंदी हिनाच्या हातावर रंगली. 5 / 7हिना सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. गेल्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. 6 / 7हिनाच्या या कठीण काळात रॉकी तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. त्याने तिची साथ सोडली नाही. 7 / 7आता लग्न करत दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.