Join us  

Say NO To Maldives! लक्षद्वीप नाही व्हॅकेशनसाठी मालदीवला पोहोचली अभिनेत्री, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 12:57 PM

1 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव्सच्या मंत्र्यांनी मोदींविरोधात टिप्पणी केली होती. त्यानंतर भारतीयांनी सुरू केलेल्या बायकॉट मालदीव वादात अनेक सेलिब्रिटींनी उडी घेतली.
2 / 9
बॉलिवूडमधील अक्षय कुमार, सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाले. मालदीव विरुद्ध लक्षद्वीप वादादरम्यान आता एका टीव्ही अभिनेत्रीने मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 9
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अदिती भाटिया सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. अदितीने मालदीव व्हॅकेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
4 / 9
हे फोटो शेअर करत तिने 'vacay cam' असं कॅप्शन दिलं आहे. पण, मालदीवमध्ये व्हॅकेशनसाठी गेलेल्या अदितीला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे.
5 / 9
अदितीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट करत 'नो मालदीव फक्त लक्षद्वीप' अशी कमेंट केली आहे.
6 / 9
तर दुसऱ्याने 'Say No to Maldives' असं कमेंटमध्ये लिहिलं आहे. 'लक्षद्वीपला जा' अशी कमेंटही केली आहे.
7 / 9
'बॉयकॉट मालदीव टुरिझम', असंही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
8 / 9
अदितीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये हे मोहब्बते' या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
9 / 9
गेल्या अनेक वर्षांपासून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अदिती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
टॅग्स :लक्षद्वीपमालदीवटिव्ही कलाकार