Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 10:32 IST

1 / 9
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही तुम्हाला १८ वर्षापूर्वीची अशी प्रेम कहाणी सांगतो, ज्यांनी केवळ फिल्म जगतात नाही तर कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती. ही प्रेम कहाणी आहे कन्नड सिनेमातील अभिनेत्री राधिका कुमारस्वामी
2 / 9
राधिका यांना २००६ मध्ये जेडीएस नेता आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रेमासाठी लग्न करण्याचा राधिका यांच्या एका निर्णयाने त्यांच्या फिल्मी करिअरला कायमचे उद्ध्वस्त करून टाकले.
3 / 9
राधिका यांच्यासोबत लग्न करून एचडी कुमारस्वामी यांच्याही आयुष्यात उलथापालथ झाली. कुमारस्वामी यांच्या राजकीय आयुष्याऐवजी खासगी आयुष्याबाबत लोकांमध्ये कुतुहल निर्माण झालं. राधिकानं २००२ मध्ये कन्नड फिल्म नीला मेघा शमा यातून डेब्यू केले होते.
4 / 9
राधिका यांनी ९ वीच्या वर्गातून सिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. त्यांचा लीड रोल असलेली पहिली फिल्म विजय राघवेंद्र यांच्यासोबतचा निनगागी होता. त्यानंतर शिवराजकुमार अभिनीत तवरिगे बा तांगी सिनेमातही त्यांनी भूमिका निभावली. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले, तरीही प्रेमासाठी राधिका यांनी त्यांच्या उभरत्या करिअरला ब्रेक लावला
5 / 9
राधिका यांनी पुढील करिअरमध्ये ३० सिनेमामध्ये काम केल्यानंतर प्रोड्युसर म्हणून पुढे आल्या. त्यांचा निर्माती म्हणून पहिली फिल्म २०१२ मध्ये यश ची लकी होती. राधिका कुमारस्वामी त्यांच्या खासगी आयुष्यासाठी कायम माध्यमात चर्चेत राहतात.
6 / 9
२०१० मध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत राधिका यांनी गुपचूप लग्न केल्याचे पुढे आले. राधिका यांनी स्वत: याचा खुलासा केला होता की, २००६ मध्ये एचडी कुमारस्वामी यांच्याशी त्यांचे लग्न झालं, आणि त्यांना शमिका नावाची एक मुलगीही आहे.
7 / 9
लग्नाच्या वेळी एचडी कुमारस्वामी यांचे वय ४७ होते, तर राधिका त्यांच्यापेक्षा वयाने २७ वर्ष लहान होती. राधिका एचडी कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी आहे. कुमारस्वामी यांचे पहिले लग्न १९८६ मध्ये झालं होते.
8 / 9
राधिका यांच्या वडिलांनी एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयाविरोधात होते. परंतु घरच्यांनी विरोध केला असतानाही राधिका यांनी कुमारस्वामींसोबत लग्न करण्यावर ठाम राहिल्या. राधिका आणि एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचं लग्न सीक्रेट ठेवले.
9 / 9
राधिका कुमारस्वामी आता उद्योग क्षेत्रात प्रसिद्ध उद्योजिका झाल्या आहेत. कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांसोबत लग्न केल्यानंतर राधिका कोट्यवधीच्या मालकिन बनल्या आहेत. त्यांची संपत्ती जवळपास १२४ कोटी इतकी आहे. तर पती एचडी कुमारस्वामी यांच्याकडे १८१ कोटी संपत्ती आहे.
टॅग्स :कर्नाटक राजकारण