IN PICS : बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी होते एकमेकांचे क्लासमेट्स, एकीचा तर ‘टायगर’ होता क्रश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:29 IST
1 / 8इयत्ता चौथीपासून ऋतिक रोशन आणि उदय चोप्रा एकाच वर्गात होते. आजही या दोघांची मैत्री तशीच आहे जशी बालपणी होती. वाईट काळातही त्यांनी एकमेकांना खंबीरपणे साथ दिली आहे.2 / 8बॉलिवूडच्या तीन खानांपैकी सलमान आणि आमीर एकाच वर्गात होते. इयत्ता दुसरीत ते एकत्र होते. मात्र एक वर्षच हे दोघे एकत्र शिकले. या वर्षभरात कधीच त्यांचा एकमेकांशी संवाद झाला नाही.3 / 8अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि दिग्दर्शक करण जोहर बॉलिवूडचे पॉप्युलर BFF म्हणजे बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर आहेत. ट्विंकल आणि करण एकाच शाळेत शिकायचे. एका बोर्डिंग स्कूलमध्ये या दोघांचं शिक्षण झालं. करण जोहरनं त्याच्या पुस्तकाचा याचा उल्लेखदेखील केला आहे.4 / 8‘बागी’ चित्रपटात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंत केलं होतं. हे दोघं फक्त एकाच शाळेत शिकले नाहीत तर चांगले क्लासमेट्स आहेत. श्रद्धाने करण जोहरच्या चॅट शोमध्ये एक खुलासा केला होता. शाळेत असताना टायगर श्रॉफ माझा क्रश होता, असं ती म्हणाली होती.5 / 8विराट कोहलीची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचं शालेय शिक्षण साक्षी सिंह धोनीसोबत झालं आहे. या दोघी आसामच्या सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकायच्या.6 / 8अर्जुन कपूर व वरूण धवन एका शाळेत शिकले नाही. पण हो, अॅक्टिंगचं ट्रेनिंग मात्र त्यांनी एकाच ट्रेनिंग स्कूलमध्ये घेतलं. त्या अर्थाने ते एकमेकांचे क्लासमेस आहेत.7 / 8नव्वदचं दशक गाजवणाऱ्या सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ यांचं शिक्षण एकाच शाळेत झालं आहे. याच शाळेत श्रद्धा कपूरचंदेखील शिक्षण झालं.8 / 8आमिर खानचा भाचा व अभिनेता इमरान खानची एक्स-वाईफ अवंतिका आणि रणबीर कपूर एकाच शाळेत होते. बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यावेळी या दोघांमधलं नातं मैत्रीच्या पुढे गेलं होतं. ते एकमेकांना डेट करत होते. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही.