Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमाच्या सेटवर जडलं होतं एकमेकांवर प्रेम, मात्र या गोष्टीमुळं अपूर्ण राहिली अमिताभ बच्चन-रेखा यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 17:35 IST

1 / 8
बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत जे प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केले. गेल्या काही वर्षांत अनेक जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. पण अशीही एक प्रेमकहाणी आहे जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही. या जोडप्याने एकत्र यावे अशी प्रत्येकाची इच्छा होती, पण नशिबात काहीतरी वेगळेच होते. ही प्रेमकहाणी अपूर्णच राहिली. ही प्रेमकहाणी इतर कोणाची नसून अमिताभ बच्चन आणि रेखा यांची आहे.
2 / 8
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याची सुरुवात चित्रपटाच्या सेटवर झाली होती. एकत्र काम करत असताना हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले, पण त्यानंतर जया बच्चन रेखा यांना असे काही बोलल्या की ते दोघे कायमचे वेगळे झाले.
3 / 8
रेखा आणि अमिताभ बच्चन यांची प्रेमकहाणी सर्वांना माहित आहे. एकीकडे रेखा यांनी नेहमीच अमिताभ बच्चन यांच्याबद्दलच्या भावना सर्वांसमोर मान्य केल्या आहेत, तर दुसरीकडे बिग बी रेखा यांच्याबद्दल कधीच बोलले नाहीत.
4 / 8
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी दो अंजाने चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती. त्यावेळी याची कोणालाच कल्पना नव्हती. पण ही प्रेमकथा सर्वांसमोर आली जेव्हा त्यांच्या सहकलाकाराने गंगा की सौगंध चित्रपटाच्या सेटवर रेखा यांच्यासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर अमिताभ यांचा पार चढला होता.
5 / 8
यश चोप्रांनी अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमकहाणीबद्दल सर्वांना सांगितले होते. सिलसिला चित्रपटापूर्वी अमिताभ आणि रेखा त्यांच्या नात्याबद्दल कधीही जाहीरपणे बोलले नव्हते. सिलसिला यश चोप्रा यांनी बनवला होती. त्यांनीच त्यांचे नाते उघड केले.
6 / 8
अमिताभ बच्चन त्यांच्या नात्याबद्दल कधीच बोलले नाहीत, तर रेखा यांनी एका मुलाखतीत याबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्या म्हणाल्या होत्या की, 'मला काय हवंय याची कोणालाच पर्वा नाही. मी दुसरी स्त्री आहे. जया बच्चन यांचे नाव न घेता रेखा म्हणाल्या होत्या की दुसरी व्यक्ती सर्वांच्या नजरेत गरीबच राहिली आहे. दुसऱ्याचे त्याच्यावर प्रेम नाही हे माहीत असताना एकाच घरात एकत्र कसे राहता येईल?
7 / 8
एकदा जया बच्चन यांनी रेखा यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. त्यावेळी अमिताभ बच्चन घरी नव्हते. त्यांनी रेखा यांचे स्वागत केले. रात्री जेवण झाल्यावर रेखा निघणार होत्या तेव्हा जया बच्चन त्यांना म्हणाल्या की 'मी अमितला कधीही सोडणार नाही.'
8 / 8
जया बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर रेखा आणि अमिताभ कायमचे वेगळे झाले. ही प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.
टॅग्स :अमिताभ बच्चनरेखाजया बच्चन