By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:03 IST
1 / 7'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने काही दिवसांपूर्वीच लग्न करत नव्या घरात गृहप्रवेश केल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. 2 / 7गौरव मोरेने अनेक सेलिब्रिटींना आणि काही नेतेमंडळींनाही गृहप्रवेशासाठी आमंत्रित केलं होतं. 3 / 7अनेक सेलिब्रिटींनी गौरव मोरेचं अभिनंदन करत त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार गौरव मोरेच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत. 4 / 7एवढंच नव्हे तर कोणत्या कलाकराने त्याचं सोशल मीडियावर अभिनंदनही केलं नाही. त्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार गौरव मोरेच्या घरी का गेले नाहीत? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 5 / 7'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. शिवाली परब, वनिता खरात, पृथ्विक प्रताप, समीर चौघुले ही मंडळी ऑस्ट्रेलियाला होती. 6 / 7तर थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या प्रयोगासाठी नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओमकार राऊत, प्रथमेश शिवलकर अमेरिका दौऱ्यावर होते. 7 / 7पण, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता रोहित मानेने पत्नीसह गौरव मोरेच्या घरी हजेरी लावली होती. त्याने त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या.