1 / 7५ एप्रिलला सर्वांना आनंदाची बातमी कळाली. कारण गौरव मोरेच्या लग्नाची बातमी समोर आली. कॉमेडी शो गाजवणाऱ्या गौरवने गुपचुप लग्न करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला. गौरवच्या पत्नीचं मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन आहे. 2 / 7गौरव मोरेच्या बायकोचं नाव आहे प्रियंका कारेकर. गौरव आणि प्रियंका अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये जरी असले तरी त्यांनी नात्याचा जाहीर खुलासा केला नव्हता.3 / 7गौरवची बायको प्रियंकाही अभिनेत्री आहे. प्रियंका गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. प्रियंकाने बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलंय. 4 / 7प्रिंयकाने प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्यासह 'चूप' या बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. या सिनेमात सनी देओल आणि डुलकीर सलमान प्रमुख भूमिकेत होते. प्रियंंकाने बाल्कींसोबतचा फोटोही पोस्ट केला होता.5 / 7प्रियंकाचं महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील कलाकारांशी खास नातंही आहे. गौरव जेव्हा हास्यजत्रेत काम करत होता तेव्हा प्रियंकाही शोमधील अभिनेत्रींसोबत फोटो पोस्ट करायची. त्यामुळे हास्यजत्रेतील कलाकारांचीही प्रियंकासोबत चांगली मैत्री आहे.6 / 7गौरवच्या करिअरमध्ये प्रियंकाचा त्याला सपोर्ट आहे. शून्यापासून सुरुवात केलेला गौरव मोरे आज यशाच्या शिखरावर आहे. गौरवच्या या संपूर्ण प्रवासात प्रियंकाची त्याला साथ आहे.7 / 7प्रियंका आणि गौरवने काल नवीन घरात प्रवेश केला. फिल्डरपाड्याचा बच्चन नावाने प्रसिद्ध असलेल्या गौरवने पवई भागात नवीन घर खरेदी करुन आणि लग्न करुन आयुष्याचीही नवी सुरुवात केलीये