By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:02 IST
1 / 102001 ते 2004 दरम्यान 'खुल जा सिम सिम' हा गेम शो खूप गाजला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन वर्मा करत होता, तो त्या काळातील मोठा टीव्ही स्टार होता. अमन वर्माने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपट केले आणि खूप नाव कमावले. पण अचानक तो गायब झाला. त्यानंतर कास्टिंग काउचच्या वादाने त्यांचे करिअर उद्ध्वस्त केले. अमन वर्मा सध्या कुठे आहे आणि काय करत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो.2 / 10अमन वर्माने 30 वर्षांपूर्वी टीव्ही शो 'लाल दिवारें'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तो 'महाभारत कथा'मध्येही दिसला. त्यावेळी अमन वर्माची लोकप्रिया इतकी होती की त्याने चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.3 / 10अमन वर्माने 1999 मध्ये आलेल्या 'संघर्ष' चित्रपटात प्रीती झिंटाच्या प्रियकराची भूमिका केली होती. यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. अमन वर्माची सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली . हा त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.4 / 102000 च्या दशकात एक वेळ आली जेव्हा अमन वर्माने चित्रपटांमध्ये लीड रोल करण्यास सुरुवात केली. 'प्राण जाये पर वचन ना जाए' आणि 'कोई है'मध्ये तो मुख्य अभिनेता होता. अमन वर्मा 'बागबान', 'अंदाज', 'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी', 'बाबुल' आणि 'वाह! 'लाइफ हो तो ऐसी' सारख्या चित्रपटात झळकला होता. 5 / 10पण नंतर असे काही घडले की अमन वर्माच्या करिअरला उतरती कळा लागली आणि तो इंडस्ट्रीतून गायब झाला. 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'सीआयडी', 'घर एक मंदिर', 'शांती', 'कलश', 'पिया का घर', 'रिश्ते' यांसारख्या टीव्ही मालिका करून छोट्या पडद्यावर प्रसिद्ध झालेला अभिनेता अचानक जमिनीवर आला.6 / 10अमन वर्माने 'बिग बॉस'च्या घरात खुलासा केला होता की स्टारडमची नशा त्याच्या डोक्यात गेली होती. त्यामुळे त्याच्या हातून काही चुका झाल्या. अमन वर्मा 'बिग बॉस 9' मध्ये आला तेव्हा त्याने सांगितले होते की, जेव्हा त्याचे करिअर शिखरावर होते तेव्हा त्याला मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. त्यामुळे तो चुकीच्या मार्गावर गेला. 7 / 10अमन वर्मा म्हणाले होते की, त्याला खूप गर्व झाला होता. त्यांच्यात फार अहंकार होता. त्यावेळी त्याला कोणी योग्य दिशा दाखवली असती तर आज त्याची कारकीर्द वेगळी असती, असे या अभिनेत्याने म्हटले होते.8 / 10दुसर्या एका मुलाखतीत अमन वर्माने कबूल केले होते की त्याने अनेक गोष्टी केल्या ज्यामुळे सर्वकाही बिघडून गेलं. छोट्या-छोट्या गोष्टींवर तो चिडायचा आणि कधी कधी सेट सोडून जायचा. अमन वर्मा यांनी सांगितले होते की, 2005 पर्यंत सर्व काही ठीक सुरळीत सुरु होते त्यानंतर मात्र त्याचे फासे उलटे पडले. 9 / 102005 मध्ये अमन वर्मा कास्टिंगमध्ये काऊचमध्ये अडकला होता. एका स्टिंग व्हिडिओमध्ये अमन वर्मा एका मॉडेलकडून सेक्सुअल फेवर्स मागताना दिसला होता. यानंतर अमन वर्मा चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतून काही वर्ष गायब झाला. त्याला कामही मिळाले नाही.10 / 10