Urfi Javed Birthday: वडिलांनी केलं टॉर्चर, नातेवाईक म्हणायचे पॉर्न स्टार, स्ट्रगलनं भरलेलं आहे उर्फीचं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 12:26 IST
1 / 10उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीपासून तिच्या अतरंगी कपड्यांमुळे खूप चर्चेत आहे. तिची ही स्टाइल काहींना आवडते, तर काहीजण तिला ट्रोल करतात. उर्फीला या सगळ्याची पर्वा नसली तरी ती ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत असते. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 10उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. 15 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेल्या उर्फीने मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. तिला अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे उर्फी अगदी लहान वयात मुंबईत आली. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 10उर्फी जावेदला 2016 मध्ये बडे भैया की दुल्हनियामध्ये अवनी पंतची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर, त्याच वर्षी तिला चंद्र नंदिनी ही मालिका मिळाली, ज्यामध्ये ती छायाच्या भूमिकेत दिसली. याशिवाय मेरी दुर्गा या शोमधून ती लोकप्रिय झाली. उर्फीने बेपन्ना, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 2020 मध्ये ती इतकी लोकप्रिय झाली की 2021 मध्ये तिनं बिग बॉस OTT मध्ये एंट्री घेतली. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 10उर्फी जावेदला खरी ओळख बिग बॉस ओटीटीनंतर मिळाली. यानंतर तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलची चर्चा होऊ लागली आणि आज ती स्टाइल दिवा बनली आहे. सोशल मीडियावर तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 10उर्फी जावेदने एका मुलाखतीत सांगितले होते की, वडिलांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. टॉर्चर सहन केल्यानंतर ती बहिणींसोबत दिल्लीला पळून गेली. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 10दिल्लीत आल्यानंतर उर्फीने कॉल सेंटरमध्ये काम केले. त्यानंतर एका फॅशन डिझायनरकडे असिस्टंट म्हणूनही काम केले आणि त्यानंतर ती मुंबईत आली. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 10उर्फी जावेद 11वीत होती तेव्हा कोणीतरी तिचा फोटो अॅडल्ट साइटवर पोस्ट केला होता. एका मुलाखतीत तिने हे सांगितले. ती म्हणाली होती की, यानंतर नातेवाईक म्हणायचे की हिचं बँक अकाऊंट चेक कर, कोट्यवधी असतील त्यात कारण ही पॉर्न स्टार झाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 10उर्फी जावेद आणि पारस कालनावत एकदा एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. दोघांनी टीव्ही शो 'मेरी दुर्गा'मध्ये एकत्र काम केले होते आणि याचदरम्यान ते प्रेमात पडले. मात्र लवकरच उर्फी आणि पारसमधील नातं संपले आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले. (फोटो इन्स्टाग्राम)9 / 10उर्फी जावेदबद्दल सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की ती बॉलिवूड गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांची नात आहे. मात्र, नंतर जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आझमी यांनी मीडियाला सांगितले की, उर्फी जावेदचा आमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही. (फोटो इन्स्टाग्राम)10 / 102021 मध्ये उर्फी जावेदने सांगितले होते की ती कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. ती म्हणाली होती, मी कधीही मुस्लिम पुरूषाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम वा अन्य कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे मी कोणाच्याही प्रेमात पडू शकते. मला आवडेल, त्या व्यक्तिशी मी लग्न करेल.(फोटो इन्स्टाग्राम)