Join us
Daily Top 2Weekly Top 5

५ वेळा घरातून पळाली, ३ वर्षे व्हीलचेअरवर; आयुष्यात खूप चढ-उतार, कोण आहे 'ही' सुंदरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:41 IST

1 / 11
३० वर्षांच्या या सिंगरने टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांशी मैत्री केली आहे. 'द ५०' या शोमधील आपल्या गेम प्लॅनमुळे तिने लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
2 / 11
नेहमीच बेधडक राहणाऱ्या सिंगरच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले आहेत. ती सलग तीन वर्षे व्हीलचेअरवर होती आणि अनेकदा घरातून पळून आली होती. तिचे वडील अफगाणिस्तानचे असून आई आसामची आहे.
3 / 11
या सिंगरचं नाव आहे खानजादी. मात्र तिचं खरं नाव फिरोजा खान असं आहे. फिरोजा एक रॅपर, सिंगर आणि म्युझिशियन आहे. २०२२ मध्ये तिने एमटीव्हीच्या 'हसल २.०' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.
4 / 11
फिरोझाने 'हसल २.०' मध्ये तिचं पहिले गाणं 'आझादी' सादर केलं होतं. त्यानंतर तिने 'नो बाउंड्रीज' आणि 'तराजू' सारखी लोकप्रिय गाणी गायली.
5 / 11
२०२३ मध्ये जेव्हा फिरोजा खानने भारताचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १७' मध्ये सहभाग घेतला, तेव्हा ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली, तिची जोरदार चर्चा रंगली.
6 / 11
'बिग बॉस १७' मध्ये असताना खानजादीने तिच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि आजारपणाबद्दल भाष्य केलं होतं. शोमध्ये ती इतकी अस्वस्थ झाली होती की, तिला शो सोडून घरी जायचं होतं.
7 / 11
ती वारंवार बाहेर जाण्याची मागणी करत असे, ज्यावरून अभिनेता सलमान खानने तिला अनेकदा खडसावलं होतं. फिरोजा खान मूळची आसामची असून ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते.
8 / 11
फिरोजाची आई भारतीय आणि वडील अफगाणिस्तानचे आहेत. फिरोजाला लहानपणापासूनच लिहिण्याची आणि गाण्याची आवड होती. याच आवडीमुळे ती अनेकदा घरातून पळाली.
9 / 11
'बिग बॉस'मध्ये तिने सांगितलं होतं की, ती तिच्या स्वप्नांसाठी एकदा-दोनदा नाही, तर तब्बल ५ वेळा घरातून पळून थेट मुंबईत आली होती.
10 / 11
शोमध्ये खुलासा केला होता की, फिरोजा ३ वर्षे व्हीलचेअरवर होती. मात्र तिला नक्की कोणता आजार आहे हे तिने स्पष्ट केलं नाही. तिने वारंवार सलमान खान आणि बिग बॉसला सांगितलं होतं की, त्यांनी तिच्या घरच्यांशी बोलून तिच्या आजारपणाबद्दल चौकशी करावी.
11 / 11
'बिग बॉस १७' नंतर खानजादीने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते आणि सध्या ती 'द ५०' या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन