Join us

"इंडस्ट्रीत अजूनही या गोष्टी सुरु आहेत...", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:24 IST

1 / 7
नुकतीच शिवांगीने पिंकव्हिलाला मुलाखत दिली. यावेळी तिने टीव्ही अभिनेत्री म्हणून झालेल्या मतभेदाचा अनुभव सांगितला. एका डिझायनरने तिला टीव्ही अभिनेत्री आहे म्हणून कमी दर्जाचे कपडे दिले होते.
2 / 7
टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी(Shivangi Joshi) 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. यामध्ये तिने नायराची भूमिका साकारली होती.
3 / 7
नुकतीच शिवांगीने पिंकव्हिलाला मुलाखत दिली. यावेळी तिने टीव्ही अभिनेत्री म्हणून झालेल्या मतभेदाचा अनुभव सांगितला. एका डिझायनरने तिला टीव्ही अभिनेत्री आहे म्हणून कमी दर्जाचे कपडे दिले होते.
4 / 7
शिवांगी म्हणाली, 'काही दिवसांपूर्वीच मला एका गोष्टीचं वाईट वाटलं होतं. आधी आम्ही ऐकलं होतं की मोठमोठे डिझायनर्स टीव्ही कलाकारांना कपडे देत नाहीत. आम्ही फक्त बॉलिवूड कलाकारांना देतो असं त्यांचं म्हणणं असतं.'
5 / 7
'२ डिझायनर्स तर असे आहेत जे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला टीव्ही कलाकारांना बोलवून त्यांना आऊटफिट द्यायचे. पण आता तर त्यांनीही टीव्ही वाल्यांना आऊटफिट देणं थांबवलंय. या गोष्टी सध्या सुरु आहेत.'
6 / 7
'माझ्यासोबतही नुकतंच हे घडलं. मला एका डिझायनरने असे आऊटफिट दिले जे कोणीही घ्यायला तयार नव्हतं. मला तेव्हा वाईट वाटलं. मला वाटतं टीव्ही कलाकारांची जितकी पोहोच आहे तितकी कदाचितच कोणा बॉलिवूड कलाकाराची असेल. या गोष्टी बदलण्याची गरज आहे.'
7 / 7
शिवांगीने 'ये रिश्ता क्या कहलाता है'शिवाय 'खेलती है जिंदगी आँखमिचोली', 'बरसाते ,'बेगुसराय', 'बालिका वधू' या काही मालिकांमध्येही काम केलं आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारफॅशनबॉलिवूड