Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tunisha Sharma: तुनिषाकडे नव्हती कोट्यवधीची संपत्ती, भाड्याच्या घरात राहतो, कारचं EMI भरतो, आई सांगितलं वास्तव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:45 IST

1 / 8
Tunisha Sharma Birthday Today: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत असून तुनिषाच्या आईने शिजान खानवर गंभीर आरोप केले आहेत. तुनिषानं २४ डिसेंबरला 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
शिजानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप आईने केला आहे. त्यांनी शिजानला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. आज तुनिषाचा वाढदिवस आहे. ती जर या जगात असती तर आज 21 वा वाढदिवस तिने सेलिब्रेट केला असता. तुनिषाची आई वनिता यांनी जड अंत: करणाने मीडियाशी संवाद साधला. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
मुलगी गमावल्याच्या धक्क्यातून तुनिषाची आई अजूनही सावरलेल्या नाहीत. त्या म्हणाल्या, आयुष्य कसं असेल माहीत नाही... मी फक्त तुनिशासाठी मुंबईत होते, 'आता ती नाही, त्यामुळे हे शहरही माझ्यासाठी नाही. मी चंदिगडला शिफ्ट होत आहे. मी तिथे तुनिषाच्या आजोबांकडे राहीन.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
वनिता शर्माने सांगितले की, यावेळी मला तिला सरप्राईज पार्टी द्यायची होती. माझी मुलगी या वर्षी 21 वर्षांची झाली असती. मला वाटलं की मी एक थीम केक तयार करेन आणि तिच्या मैत्रिणींना आमंत्रित करेन... मी सुरुवातीपासूनच तिच्या वाढदिवसाच्या सरप्राईजचं प्लॅनिंग सुरू केलं होतं.'(फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
तुनिषाचा मृत्यू झाला तेव्हा ती गरोदर होती आणि तिने आईसाठी बरीच संपत्ती सोडली या बातम्यांवर वनिता शर्मा यांनीही नाराजी व्यक्त केली. या सर्व गोष्टींना नकार देत वनिता शर्मा म्हणाल्या की, त्यांच्या मुलीला चैनीच्या वस्तू आवडायच्या. त्या म्हणाल्या, 'तिला खरेदी करणे आवडत नव्हते पण तिला महागड्या गोष्टी आवडायच्या. तिच्या 18व्या वाढदिवशी मी तिला हिऱ्याची रिंग दिली होती. तिच्याकडे एक मोठी कारही होती, तिला स्वतःसाठी एक ऑडी हवी होती.'' (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
तुनिषानं आपल्या मागे आईसाठी आलिशान घर सोडून गेल्याची बातमी खोटी असल्याचं वनिता शर्मा यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, ती भाड्याच्या घरात राहत होती. आम्ही पुढच्या वर्षी घर घेण्याचा विचार करत होतो. याशिवाय कार असो किंवा तुनिषाचा लॅपटॉप, सर्व काही EMI वर आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
पुढे त्या म्हणाल्या, लहानपणा पासून मी तिच्यासोबत सावलीप्रमाणे होते. जेव्हा ती १८ वर्षांची झाली त्यावेळी मी तिला सेटवर एकटीला जाऊ देऊ लागली. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
तुनिषाला लहानपणापासूनच डान्स आणि अ‍ॅक्टिंगची आवड होती. ‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या मालिकेतून तिने डेब्यू केला होता. इंटरनेटवाला लव्ह, शेर ए पंजाब महाराजा रंजीत सिंह, इश्क सुभानअल्लाह अशा मालिकांत तिने काम केलं होतं.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकार