Shilpa Tulaskar : माझा बॉयफ्रेन्ड आहे हे मी त्याला सांगितलं नाही कारण..., शिल्पा तुळसकरने सांगितला ‘तो’ किस्सा...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 12:06 IST
1 / 12कधी देवकी तर कधी राजनंदिनी होऊन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा तुळसकर. सध्या ती ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत काम करताना दिसतेय.2 / 12 2018 मध्ये झी मराठीवर आलेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेत शिल्पा प्रमुख भूमिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली राजनंदिनी सरंजामेची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने झी मराठीवर पुनरागमन केलं आहे.3 / 12 झी मराठीवरच्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. सध्या मात्र शिल्पा तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. 4 / 12होय, अमृता फिल्म्स या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. या मुलाखतीत तिने तिच्या बॉयफ्रेन्ड आणि एका आवडलेल्या व्यक्तिबद्दल सांगितलं.5 / 12या क्षेत्रात काम करताना मी कधीच कोणत्या अॅक्टरच्या प्रेमात पडले नाही. कारण सतत आरसा बघणारा पुरूष भावला नाही मला. अर्थात हा त्यांच्या कामाचा भाग आहे...,असं ती म्हणाली.6 / 12ती म्हणाली, ‘फिल्म इन्स्टिट्यूटची एक डिप्लोमा फिल्म मी केली होती. तेव्हा मी कॉलेजात होते. कॉलेजातला कोणताच मित्र मला आवडला नाही. पण इंडस्ट्रीत खूप कमी लोकांकडे पाहून मला असं वाटलं की यांच्याशी लग्न झालं असतं तर मला आवडलं असतं.’7 / 12पुढे ती म्हणाली, फिल्म इन्स्टिट्यूटची डिप्लोमा फिल्म करत होते, तेव्हा तिथला डीओपी खूप आवडला होता. त्या डीओपीची व माझी खूप चांगली मैत्री झाली. मला कळलं होतं त्याला मी आवडत आहे. मलाही तो आवडायचा. पण हे मी त्याला कधी सांगितलं नाही. कारण मला बॉयफ्रेन्ड होता.8 / 12तिने सांगितलं, माझा बॉयफ्रेन्ड आहे, हे मी त्याला सांगितलं नव्हतं. कारण त्याची मैत्री मला हवी होती. ती मला गमावायची नव्हती. पण शेवटी एक वेळ अशी आली की, त्यानेच मला प्रपोज केलं.9 / 12त्याने मला प्रपोज केल्यावर, माझा बॉयफ्रेन्ड आहे हे मला त्याला सांगावं लागलं आणि आमची मैत्री तुटली. त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही पुन्हा इंडस्ट्रीत काम करताना भेटलो. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा खूप गंमतीने या विषयावर बोललो. पण मी त्याचं मन तेव्हा दुखावलं. आजही मला त्या गोष्टींचं मला दु:ख वाटतं, असंही तिने सांगितलं.10 / 12अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा जन्म 10 मार्च 1977 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. ती भावंडांमध्ये सर्वात मोठी असून तिला दोन लहान भाऊ आहेत. शिल्पाच्या पतीचं नाव विशाल शेट्टी असं आहे. या दांम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.11 / 12रूईया महाविद्यालात असताना शिल्पाने नाटकात काम करायला सुरूवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी पहिलं नाटक करणा-या शिल्पाला यानंतर अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. काही जाहिरातींमध्ये ही तिने काम केले.12 / 12शिल्पाने 1993 मध्ये ‘ब्योमकेश बक्षी’या हिंदी मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. दूरदर्शनवरच्या या गाजलेल्या मालिकेतील एका एपिसोडमध्ये तिने एक पाहुण्या कलाकाराची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.