Join us  

तितीक्षाच्या लग्नात मित्रमैत्रिणींची धमाल; पाहा लग्नातील Inside photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 4:07 PM

1 / 10
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.
2 / 10
तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली असून सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
3 / 10
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तितीक्षाने मोठ्या धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली. यावेळी त्यांच्या मराठमोळ्या लूकने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.
4 / 10
तितीक्षाने गोल्डन शेड असलेली साडी नेसली होती. तर, सिद्धार्थनेही तिला मॅच होईस असा कुर्ता आणि धोतर नेसलं होतं.
5 / 10
तितीक्षा-सिद्धार्थच्या जवळच्या मैत्रिणीने त्यांच्या लग्नातील हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6 / 10
या लग्नात ऐश्वर्या नारकर यांच्यापासून ते रसिका सुनीलपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नात मित्रमंडळींनी चांगलीच धमाल केल्याचं दिसून येत आहे.
7 / 10
रविवारी सिद्धार्थ आणि तितीक्षाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले होते.
8 / 10
केळवणाचा फोटो शेअर करत तितीक्षा आणि सिद्धार्थने लग्न करणार असल्याची बातमी दिली होती.
9 / 10
तितीक्षा आणि सिद्धार्थने 'तू अशी जवळी राहा' मालिकेत एकत्र काम केलं होतं. सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
10 / 10
सिद्धार्थने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. अजय देवगणच्या 'दृश्यम २' या सिनेमातही तो झळकला होता.
टॅग्स :तितिक्षा तावडेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार