Join us  

20 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या या अभिनेत्रींची एका दिवसाची कमाई माहितीये? वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 5:07 PM

1 / 7
अदिति भाटिया - टीव्ही जगतातील सुंदर अभिनेत्री अदिति भाटियाने अनेक शो मध्ये काम केले आहे. सिरियल्स व्यतिरिक्त बॉलीवूड चित्रपट विवाह मध्ये देखील ती चाईल्ड आर्टिस्ट म्हणून दिसली होती. एका दिवसासाठी ५० हजार रुपये फीस घेते.
2 / 7
अनुष्का सेन - टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन ‘बालवीर’ या शो मध्ये पाहायला मिळाली होती. तसेच टीव्ही सिरीयल ‘झांसी की राणी’मध्येसुद्धा ती मुख्य भूमिकेमध्ये होती. अनुष्का सेन एक दिवसासाठी ४८ हजार रुपये इतकि फीस घेते.
3 / 7
जन्नत जुबैर रहमानी - जन्नत जुबैर खूपच कमी वयामध्ये टीव्हीवरील एक मोठे नाव बनली आहे. ‘तू आशिकी’ सिरीयलमधून जन्नत खूपच प्रसिद्ध झाली. जन्नत जुबैर एका दिवसासाठी ४० हजार रुपये फीस घेते.
4 / 7
निधी भानूशाली- तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय माजिकेत भिडेच्या मुलीची भूमिका साकारणारी निधी लोकप्रिय अभिनेत्री आहे. एका एपिसोडसाठी ती 10 हजार रूपये फी घेते.
5 / 7
रिम शेख - ‘तुझ से है राबता’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारी रिम शेख अनेक सिरियल्समध्ये बालकलाकार म्हणून दिसलेली रीम शेख एका दिवसासाठी २५ हजार रुपये फीस घेते.
6 / 7
अवनीत कौर - सब टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘अलादीन - नाम तो सुना होगा’मध्ये अवनीत कौर मुख्य भूमिका करत आहे फक्त १७ वषार्ची अवनीत एका दिवसासाठी ३० ते ३५ हजार रुपये फीस घेते.
7 / 7
अशनूर कौर :- टीव्ही शो ‘पटियाला बेब्स’मध्ये दिसलेली अशनूर कौर अभ्यासामध्ये हुशार असलेली अशनूर कौर आज टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. अशनूर कौर एका दिवसासाठी ३० हजार रुपये इतकी फीस घेते.
टॅग्स :टेलिव्हिजन