Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही ते थेट मोठ्या पडद्यावर एन्ट्री! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री झळकली रिंकूच्या सिनेमात, ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:25 IST

1 / 7
मराठी मालिकाविश्वातील सर्वात लोकप्रिय मालिकांच्या यादीत ठरलं तर मग या मालिकेचं नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही. या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे.
2 / 7
या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली आणि जुई गडकरीची मुख्य भूमिका आहे. शिवाय सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्र आता घराघरात लोकप्रिय झालं आहे.
3 / 7
दरम्यान, मालिकेत अभिनेत्री दिशा दानडेने सायलीची जवळची मैत्रीण म्हणजे कुसुमताईची भूमिका साकारली आहे. मालिकेत सायलीवर प्रेम करणारी, साधी-भोळी कुसुम अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.
4 / 7
सध्या दिशा 'आशा' या चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरुची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
5 / 7
टीव्ही ते थेट मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलेली ही नायिका तिच्या चित्रपटातील कामामुळे अनेकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.
6 / 7
‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे.
7 / 7
दिपक पाटील दिग्दर्शित या चित्रपटात रिंकू व्यक्तिरिक्त सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण दिपक पाटील दिग्दर्शित या चित्रपटात रिंकू व्यक्तिरिक्त सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकले आहेत.हा चित्रपट १९ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे.भूमिकांमध्ये झळकले आहेत.हा चित्रपट १९ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे.
टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी चित्रपटटिव्ही कलाकार