Join us

खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे 'ठरलं तर मग'मधली सायली, पाहा जुई गडकरीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:23 IST

1 / 9
'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांना आवडते.
2 / 9
सायलीने तिच्या साधेपणाने सुभेदार कुटुंबीयांबरोबरच प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली आहे.
3 / 9
पण, मालिकेत नेहमी साडीत अत्यंत साध्या लूकमध्ये दिसणारी सायली खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे.
4 / 9
सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने नुकतंच ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5 / 9
यामध्ये जुईने शिमरी लाँग गाऊन घातल्याचं दिसत आहे. केस मोकळे सोडत अभिनेत्रीने ग्लॅमरस लूक केला आहे.
6 / 9
जुईचाचे हा लूक पाहून चाहते अवाक् झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
7 / 9
जुईने स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यासाठी हा ग्लॅमरस लूक केला होता.
8 / 9
जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
9 / 9
'पुढचं पाऊल' या मालिकेने जुईला प्रसिद्धी मिळवून दिली होती. सध्या जुई 'ठरलं तर मग'मधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे.
टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार