Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:12 IST
1 / 9तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. त्यांना एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी एक पर्वणी असते.2 / 9तेजस्वीने तिच्या वाढदिवसाला महाकाल मंदिरातून फोटो शेअर केला. मात्र या फोटोत करण कुंद्रा नसल्याने त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगली आहे.3 / 9हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने ब्रेकअपच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. अशा गोष्टींचा तिच्यावर परिणाम होत नसल्याचं स्पष्टच सांगितलं4 / 9'मला माहित आहे की, आमच्या पर्सनल आयुष्यावर लोकांचा जास्त फोकस आहे. पण ते फक्त ब्रेकअपवर फोकस करतात असं मला वाटत नाही.' 5 / 9'आमचे चाहते अशा गोष्टी करून स्वतःचच मनोरंजन करत आहेत. पण ते ठीक आहे, काही हरकत नाही. मला काही फरक पडत नाही.'6 / 9'आम्हाला या गोष्टी मजेदार वाटतात. या गोष्टी ऐकल्यावर आम्हाला हसायला येतं. मला वाटतं की, लोक आम्हाला एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.' 7 / 9'आम्हाला लोकांकडून खूप जास्त प्रेम मिळतं. करण सध्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. मी माझे प्रोजेक्ट्स करत आहे' असं तेजस्वीने म्हटलं आहे.8 / 9करण-तेजस्वी हे टीव्हीवरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी आहेत. बिग बॉस १५ मध्ये ही जोडी दिसली होती. ते २०२१ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत.9 / 9