"कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:01 IST
1 / 10'बिग बॉस १९' ची स्पर्धक तान्या मित्तल अनेकदा तिच्या विधानांमुळे चर्चेत येते. हे पुन्हा एकदा घडलं आहे. तान्याची स्टायलिस्ट रिद्धिमा शर्माने तिच्यावर पैसे न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. 2 / 10रिद्धिमा शर्माने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक नोट लिहिली, ज्यामध्ये तान्या मित्तलवर पैसे न देण्याचा आरोप केला. तिची नाराजी व्यक्त करताना तिने म्हटले आहे की तान्या मित्तलची टीम तिला 'मूर्ख' समजत आहे. 3 / 10रिद्धिमाने पुढे म्हटलं आहे की ती तान्या मित्तलला साड्या पाठवत असल्याचे सर्व पुरावे तिच्याकडे आहेत आणि तिने तिच्या टीमला शक्य तितक्या लवकर तिचे पैसे देण्यास सांगितले आहे.4 / 10'मी नेहमीच तान्या मित्तलला पाठिंबा दिला आहे. प्रेक्षकांना माहित आहे की, मी तिचं स्टाईलिंग करते. ती माझ्याशी बोललेली नाही मी तिला भेटवस्तू आणि पत्र देखील पाठवलं, पण तिने आभारही मानले नाहीत.'5 / 10'मी आउटफिट पाठवत आहे, पोर्टरचे पैसे देत आहे, आणि आता टीम मला सांगत आहे की जर साडी आज आली नाही तर मला माझी फी अजिबात मिळणार नाही.'6 / 10'मी इतके दिवस खूप मेहनत करत आहे - मी मूर्ख आहे का? व्वा! ब्रँडना अजून कोणतंही रिटर्न मिळालेले नाहीत आणि मी आठवडाभर पाठपुरावा करून थकले आहे. मी तान्याच्या टीमला माझे पैसे परत करण्याची विनंती करते.'7 / 10'दुसरं म्हणजे, मी नेहमीच प्रत्येक मुलाखतीत तिला पाठिंबा दिला आहे. मला असं कधी होईल असं वाटलं नव्हतं. कार्यक्रमाच्या एक तास आधीपर्यंत मी सर्वकाही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते, तरीही माझ्याशी असे वागले जात आहे.' 8 / 10'तान्याच्या टीममधील एका मुलीने मला मेसेज केला - माझ्याकडे पुरावे आहेत की जर मी आजच्या साडीची व्यवस्था केली नाही तर ते मला पैसे देणार नाहीत! मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते - कृपया माझे पैसे द्या' असं रिद्धिमाने म्हटलं आहे.9 / 10तान्याचा दावा आहे की, तिने ८०० साड्या आणल्या होत्या. 'बिग बॉस १९' च्या घरात राहताना तान्या मित्तल अनेकदा तिच्या साड्यांमुळे चर्चेत आली. 10 / 10तान्याने वारंवार दावा केला की, तिने सलमान खानच्या शोमध्ये सुमारे ८०० साड्या आणल्या होत्या आणि ती तिचे कपडे पुन्हा वापरत नाही. ती शोमध्ये देखील अनेकदा विधानांमुळे चर्चेत आली होती.