५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:48 IST
1 / 9तान्या मित्तल ही बिग बॉस १९ ची स्पर्धक आहे, जी सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय आहे. मात्र सध्या तान्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.2 / 9अभिनेत्री तिची व्हीआयपी लाईफस्टाईल दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. ती शोमध्ये साड्या परिधान करून तिचा भारतीय लूक दाखवत आहे.3 / 9तान्याने बिग बॉसच्या घरात किती साड्या आणल्या आहेत हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रीमियर एपिसोडमध्ये तान्याने स्वतः याबाबत खुलासा केला.4 / 9तान्याने सांगितलं होतं की, ती ५०० हून अधिक कस्टमाइज्ड साड्या घेऊन घरात आली आहे. ५० किलोच्या दागिन्यांसह, तिने चांदीची भांडी आणि बॉटल आणली आहे.5 / 9तान्या ही एकमेव स्पर्धक आहे जिला बिग बॉसच्या घरात स्वतःची भांडी आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. तान्या स्वतःला स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर म्हणते.6 / 9या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यासाठी तान्याला नॉमिनेट करण्यात आलं आहे. घरातील सदस्यांचा असा विश्वास आहे की, ती शोमध्ये तिची रियल पर्सनॅलिटी दाखवत नाही.7 / 9लोक तिला फेक म्हणत आहेत. तिचे अशनूर कौरशी भांडण झालं आहे. तिला तिच्या फेकपणामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहेत.8 / 9बिग बॉस १९ मध्ये या आठवड्यात घराबाहेर पडण्याबाबत जनता काय निर्णय घेते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या आठवड्यात कोण बाहेर पडणार याची चर्चा रंगली आहे. 9 / 9