Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तान्हाजी' फेम अभिनेत्रीने केलं लग्न, नवरा आहे डॉक्टर! फोटो शेअर करत म्हणाली- “आजपासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:31 IST

1 / 8
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नाचा माहौल असल्याचा पाहायला मिळतोय.
2 / 8
अगदी अलिकडेच अभिनेत्री पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड या लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्या.
3 / 8
यांच्या पाठोपाठ आता सोशल मीडियावर ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ फेम अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेचे लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4 / 8
भाग्यश्रीने सोशल मीडियार पोस्ट करून आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याचं जाहीर केलं.
5 / 8
भाग्यश्रीचा नवरा हा पेशाने डॉक्टर आहे. नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लग्नसोहळ्यातील खास फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हटलंय, “माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण. नवीन प्रवासाची सुरुवात आयुष्यभराची साथ “आजपासून तू आणि मी”.
6 / 8
अभिनेत्रीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
7 / 8
भाग्यश्री न्हाळवेने 'कुंकू टिकली आणि टॅटू', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' तसेच फुलाला सुगंध मातीचा यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय हिंदी टेलिव्हिजन विश्वातही चांगला वावर आहे.
8 / 8
'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' सिनेमात तिने काम केले आहे. या सिनेमात भाग्यश्रीने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया