आता बबिताजींना विसराल, कारण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये आली 'रुपवती'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 15:23 IST
1 / 8गेल्या १४ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गाजत आहे. या मालिकेतील सर्वच पात्र लोकप्रिय झाली. प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. वेगळी भाषा, संस्कृती याचं दर्शन मालिकेने घडवलं.2 / 8२०१७ मध्ये मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीने मालिकेला रामराम केला. त्यानंतर ती परतलीच नाही. जेठालाल आणि दयाबेन या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे.3 / 8तर दुसरीकडे मालिकेत ग्लॅमरचा तडका लावणारी बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता. मुनमुन दत्तावर जेठालाल लट्टू होतो असे मजेशीर प्रसंगही मालिकेत दाखवण्यात आले.4 / 8पण आता बबितालाही ग्लॅमरमध्ये टक्कर द्यायला एक अभिनेत्री मालिकेत येत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये इतक्या वर्षात पहिल्यांदाच एक नवीन कुटुंब येत आहे. नुकतंच मालिकेच्या निर्मात्यांना या नवीन कुटुंबाची ओळख करुन दिली.5 / 8मालिकेत चार सदस्यांचं नवीन कुटुंब येत आहे. हा राजस्थानी बिंजोला परिवार आहे. रत्न सिंह चतुर सिंह बिंजोला मुख्य आहेत. तर त्यांची पत्नी आहे रुपवती. तसंच त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. 6 / 8धरतीने याआधीही काही मालिका केल्या आहेत. 'महिमासागर'मधली तिची माही भूमिका गाजली. 'क्या हाल','मिस्टर पांचाल','वो तो है अलबेला', 'पूर्णिमा' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.7 / 8बिंजोला यांची पत्नी आहे रुपवती. ही भूमिका अभिनेत्री धरती भट साकारत आहे. धरती खऱ्या आयुष्यात अत्यंत ग्लॅमरस आणि सुंदर आहे.8 / 8तिच्या एन्ट्रीने आता रुपवती आणि बबिता यांच्या सौंदर्याची टक्कर बघायला मिळणार आहे. तसंच या नवीन कुटुंबाच्या येण्याने गोकुलधाम सोसायटीत आणखी काय काय नवीन घडामोडी घडतात हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.