Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील छोटे शंभूराजे आठवतात का? अनन्या पांडेसोबत केलीय स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:08 IST

1 / 9
'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक मालिका. छत्रपती संभाजीराजे यांची शौर्यगाथा सांगणारी ही मालिका होती.
2 / 9
या मालिकेत अभिनेता अमोल कोल्हेने संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आजही तो चाहत्यांच्या लक्षात आहे.
3 / 9
'स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये बाळ शंभूराजेंच्या भूमिकेत बालकलाकार दिवेश मेदगे झळकला होता. त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
4 / 9
बाळ शंभूराजे बनून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला दिवेश आता मोठा झाला आहे. दिवेशमध्ये आता इतका बदल झालाय की त्याला ओळखणंही कठीण जातंय.
5 / 9
दिवेश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टबद्दल तो चाहत्यांना माहिती देत असतो.
6 / 9
दिवेश नेटफ्लिक्सवरच्या 'हॅलो बच्चो' आणि 'हसल' या वेब सीरिजमध्ये झळकला आहे.
7 / 9
याशिवाय अनन्या पांडेसोबत एका जाहिरातीत त्याने स्क्रीनही शेअर केली आहे.
8 / 9
'शिवा', 'पिंकीचा विजय असो' या मालिकांमध्येही तो दिसला होता.
9 / 9
दिवेश त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरुन दिसून येतं.
टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीटिव्ही कलाकार