Join us

हाय स्लिट, डीप नेक ड्रेस अन्...; हॉट अंदाजातील 'स्वामिनी' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:05 IST

1 / 7
छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'स्वामिनी' ही मालिका. पेशव्यांचा इतिहास सांगणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. याच मालिकेतून अभिनेत्री सानिका बनारसवाले घराघरात पोहोचली.
2 / 7
सानिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिच्या नवीन प्रोजेक्टबाबत सानिका अनेकदा सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते. अनेकदा सानिका इन्स्टाग्रामवर तिचे हॉट अंदाजातील फोटो शेअर करताना दिसते.
3 / 7
नुकतंच सानिकाने केलेला लूक चर्चेत आला आहे. सानिकाने हाय स्लिट आणि डीप नेक असलेला ड्रेस परिधान करत हॉट लूक केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
4 / 7
सानिकाने केस मोकळे सोडत ग्लॅमरस लूक केला आहे. या ड्रेसला मॅचिंग अशा हाय हिल्स तिने घातल्या आहेत.
5 / 7
सानिकाने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत. तिचा हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. चाहत्यांनी सानिकाच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
6 / 7
दरम्यान, 'स्वामिनी' मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या सानिकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वामिनी' नंतर ती 'स्वाभिमान' मालिकेत झळकली होती. सध्या ती 'कस्तुरी' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
7 / 7
सानिकाने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तिच्या पतीचं नाव ऋषभ असं आहे. सानिकाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारसेलिब्रिटी