स्वत:ला कशी फिट ठेवते 'नागिन फेम' सुरभी? गुपीत सांगितलं, दिली मोठी माहिती; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:56 IST
1 / 12सोशल मीडिया सेन्सेशन सुरभी चंदनाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांना नजर हटवता येत नाही. अभिनेत्रीच्या फिटनेसचे रहस्य काय ते तिनंच सांगितलं आहे.2 / 12अभिनेत्री सुरभी चंदना वेगवेगळ्या आउटफिटमधले तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ज्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत असते. 3 / 12कधी तिची स्टाईल पारंपारिक पोशाखात सगळ्यांना आवडते तर कधी ती वेस्टर्न ड्रेसमध्ये अदांनी चाहत्यांना घायाळ करते4 / 12फॅशन सेन्स, अदा आणि स्टाइल एकीकडे पण सुरभी सर्वाधिक महत्व तिच्या फिटनेसला देते.5 / 12फिटनेसमुळेच आपले चांगले फोटो येतात असा तिचा ठाम विश्वास आहे. 6 / 12अभिनेत्री तिच्या आहाराबाबत खूप जागरूक आहे. तसेच, ती वर्कआऊट करण्यास मागे हटत नाही. पूर्वी सुरभी अशी नव्हती. पण नागिन मालिकेसाठी तिनं स्वतःला बदलले. 7 / 12सुरभीनं एका मुलाखतीत सांगितले होतं की, जर तुम्हाला नागिनची भूमिका करायची असेल तर तुमची फिगर मेंटेन असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही अशा भूमिकांमध्ये फीट बसू शकाल.8 / 12सुरभीला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. पण फिटनेस लक्षात घेऊन तिने आपला आहार अतिशय काटेकोर ठेवला आहे.9 / 12टीव्ही जगतातील ही सुंदर अभिनेत्री फिगरसाठी सर्वात जास्त काळजी घेते ती म्हणजे डाएट. शूटिंगदरम्यान अभिनेत्री सहसा जिममध्ये जात नाही. शुटिंग सेटवर ती १० ते १२ तास काम करते. त्यामुळे सेटवरच तिचं वर्कआउट होतं आणि यादरम्यान ती खूप कॅलरीज बर्न करते.10 / 12सुरभी जेव्हा कोणताही प्रोजेक्ट साइन करते तेव्हा तिच्या दैनंदिन आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश होतो. पण अभिनेत्रीचे स्वतःचे काही चीट डे आहेत ज्यात तिला पिझ्झा आणि पावभाजी खायला आवडते. दिवसातलं एकावेळचं जेवण खूप हलकंफुलकं असेल याचीही विशेष काळजी घेते.11 / 12सुरभीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि ती तरुणाईची प्रेरणा आहे. इंस्टाग्रामवर तिचे ५.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. चाहते नेहमीच सुरभीच्या लेटेस्ट फोटोंची वाट पाहत असतात.12 / 12सुरभीने तिच्या करिअरची सुरुवात २०१४ साली 'कुबूल है' या लोकप्रिय मालिकेतून केली होती. या मालिकेतून तिला चांगली लोकप्रियताही मिळाली. यानंतर ती 'इश्कबाज' आणि 'संजीवनी' सारख्या मालिकांमध्ये दिसली. सध्या ती 'शेरदील शेरगिल' या मालिकेचा भाग आहे.