By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:55 IST
1 / 8सुलेखा तळवलकर या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. वयाची पन्नाशी पार केली तरी अजूनही सुलेखा तळवळकर तितक्याच सुंदर दिसतात. 2 / 8सुलेखा तळवलकर यांनी अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचा लेक अंबर तळवलकर यांच्याशी लग्न केलं. त्यांना टिया ही मुलगी आणि आर्य हा मुलगा आहे. 3 / 8सुलेखा तळवलकरांची लेक टिया तळवळकरही त्यांच्याइतकीच सुंदर दिसते. पण टियाने आई सारखी अभिनयाची वाट धरलेली नाही. 4 / 8टियाने २०२१ मध्ये मिस दादर ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा ती कलाविश्वात पदार्पण करेल असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र टियाने करिअरसाठी वेगळा मार्ग निवडला. 5 / 8टियाने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. लहानपणापासूनच जेवण बनवणे, लोकांना खाऊ घालण्याची आवड असल्याचं टियाने म्हटलं होतं. 6 / 8सुलेखा तळवलकर अनेकदा लेक आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर करत असतात. 7 / 8टिया सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसल्याचं दिसतं. काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 8 / 8सध्या सुलेखा तळवलकर या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या तिलोत्तमाच्या भूमिकेत आहेत.