By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:54 IST
1 / 7अभिनेता अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांनी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.2 / 7मालिकेतील कला आणि अद्वैतची जोडीने सर्वांना आपलंसं केलं आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसते आहे. 3 / 7अलिकडेच मालिकेमध्ये नैनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा सपकाळने एक्झिट घेतली. त्यानंतर तिच्या जागी मालिकेत सानिका बनारसवालेची एन्ट्री झाली आहे.4 / 7सानिकाचा अभिनय सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.5 / 7दरम्यान, सानिका या मालिकेसह एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर नुकतेच तिने शेअर केलेले फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.6 / 7गुलाबी रंगाचा स्कर्ट परिधान करुन हटके पोझ देत अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलं आहे. 7 / 7'Life is better in pink...', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. सानिका या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.