मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या साखरपुड्याचे काही खास क्षण, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:28 IST
1 / 9‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.2 / 9शर्मिष्ठा लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार असून 21 जून रोजी तेजस देसाईसोबत तिचा साखरपुडा झाला आहे. 3 / 9ही माहिती स्वतः शर्मिष्ठाने सोशल मीडियावर दिली आहे. 4 / 9तिने साखरपुड्याचे काही खास फोटोदेखील शेअर केले आहेत.5 / 9शर्मिष्ठाचा साखरपुडा एप्रिल महिन्यात होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे तो पुढे ढकलला गेला.6 / 9लॉकडाऊनचे काही नियम शिथिल झाल्याने इगतपुरीच्या रिसोर्टमध्ये 35 जणांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.7 / 9लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं पालन करुन शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या साखरपुड्याचा सोहळा संपन्न झाला.8 / 9येत्या ऑक्टोबर महिन्यात शर्मिष्ठा आणि तेजस विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते.9 / 9शर्मिष्ठा सध्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत ‘संयोगिता’ची भूमिका साकारात आहे.