Shark Tank India: शार्क टॅंक इंडियाचे जज एका एपिसोडसाठी किती घेतात मानधन? वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 17:48 IST
1 / 8बिझनेस रिअॅलिटी शो 'शार्क टॅंक इंडिया' प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे. शोच्या संकल्पनेसोबतच यातील जजेसही लोकांमध्ये खूपच पॉप्युलर झाले आहेत. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा शो एका अमेरिकन शोहून प्रेरित आहे. भारतात हा शो चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. हा Shark Tank India शो एक बिझनेस रिअॅलिटी शो आहे जो सोनी सेट टीव्हीवर येतो. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, या शोचे जज खुर्ची बसण्यासाठी किती मानधन घेतात हे आम्ही सांगणार आहोत.2 / 8Ashneer Grover - अशनीर ग्रोवर BharatPe नावाच्या कंपनीचे फाउंडर आणि एमडी आहेत. त्यांची नेटवर्थ साधारण ७०० कोटी रूपये सांगितली जाते. अशात अशनीर ग्रोवर शार्क टॅंक इंडियातील सर्वात महागडे जज आहे. रिपोर्टनुसार, ते एका एपिसोडसाठी १० लाख रूपये चार्ज करतात.3 / 8Peyush Bansal, CEO of Lenskart - पीयूष बंसल LensKart कंपनीनचे को-फाऊंडर आणि सीईओ आहेत. त्यांच्या स्टायलिश चष्म्यांचा बिझनेस जगभरात पसरला आहे. ते या शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसण्यासाठी एका एपिसोडचे ७ लाख रूपये घेतात.4 / 8Vineeta Singh, Co-founder of SUGAR cosmetics - विनीता सिंह सुगर कॉस्मेटिकच्या को-फाऊंडर आणि सीईओ आहेत. Sugar Cosmetic चे प्रॉडक्ट्स चांगलेच प्रसिद्ध आहेत. अशात विनीता सिंह एका एपिसोडसाठी ५ लाख रूपये घेतात.5 / 8Anupam Mittal, Founder of People Group - अनुपम मित्तल शादी डॉट कॉमचे को फाऊंडर आणि सीईओ आहेत. त्यांनी १९९७ मध्ये सगाई डॉट कॉमने याची सुरूवात केली होती. ते वेगवेगळ्या बिझनेसमध्येही गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात. पीपुल्स ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल हे एका एपिसोडसाठी ७ लाख रूपये घेतात.6 / 8Namita Thapar, Executive Director of Emcure Pharmaceutical Namita Thapar - नमिता थापर एक फार्मा कंपनी Emcure Pharmaceutical ची एक्झुकेटिव्ह डायरेक्टर आहे. त्यांची नेटवर्थ साधारण ६०० कोटी रूपये इतकी आहे. त्या शोच्या एका एपिसोडसाठी ८ लाख रूपये घेतात.7 / 8Aman Gupta, Co-founder of BOAT - अमन गुप्ता हे BOAT कंपनीचे फाऊंडर आणि एमडी आहेत. सोबतच ते टेक ब्रॅन्ड चे को-फाऊंडर आणि एमडी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ते एका एपिसोडसाठी ९ लाख रूपये घेतात.8 / 8Ghazal Alagh, CEO of Mamaearth - शार्ट टॅक इंडियामध्ये आणखी एक फीमेल जज आहेत. त्यांचं नाव आहे गजल अलघ. त्या MamaEarth च्या फाऊंडर आहेत. त्या एका एपिसोडसाठी ८ रूपये घेतात.