'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:19 IST
1 / 10सेलिब्रिटी लग्न करतात आणि त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या लग्नातील हे फोटो व्हायरल होतात. 2 / 10मात्र काही कलाकार असे असतात, ज्यांना त्यांचे आयुष्य खाजगी ठेवायला आवडते. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने तब्बल वर्षभर तिच्या लग्नाची बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. 3 / 10ती अभिनेत्री आहे शरयू सोनावणे. 4 / 10'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'पारू'मध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे मुख्य भुमिकेत आहे.5 / 10'पारू' मालिकेत सध्या आदित्य आणि पारूच्या लग्नाचे सत्य अहिल्यादेवीसमोर उघड होणार आहे. या मालिकेतील ट्रॅक प्रमाणेच अभिनेत्री स्वत:च्या लग्नाची बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. 6 / 10शरयू सोनावणेने २०२३ मध्ये जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली होती. तिने हे लग्न वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवले होते. 7 / 10लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने हे जाहीर केलं होतं. ज्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. एका मुलाखतीत शरयूने यामागील कारण सांगितले.8 / 10शरयू म्हणाली, 'लग्न लपवून ठेवण्यामागे असा काही वेगळा विचार नव्हता. पण, माझी तेव्हा एक मालिका सुरू होती. मला अशी भीती वाटली की, जर मी लगेच लग्न जाहीर केले, तर प्रेक्षक ते स्वीकारतील की नाही. कुटुंबानेही ठरवले होते की आपण लगेच नाही, तर काही काळानंतर लग्नाची घोषणा करू'.9 / 10ती पुढे म्हणाली, 'त्यानंतर लग्न जाहीर करण्यासाठी आम्हाला खास दिवस मिळत नव्हता. मग वर्षभराने आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला. त्यावेळी सगळ्यांसारखे लगेच पोस्ट करण्यापेक्षा काहीतरी वेगळे करू, असे ठरवले आणि आम्ही लग्नाच्या वाढदिवशी फोटो शेअर केले'.10 / 10शरयू सोनावणेचा नवरा जयंत लाडे हा देखील मराठी सिनेसृष्टीत सक्रिय असून, तो एक प्रसिद्ध फिल्ममेकर आणि निर्माता आहे.