Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आता आम्ही एकत्र नाही आहोत...", प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीचं ब्रेकअप! चाहत्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:27 IST

1 / 8
मनोरंजनविश्वात अनेक जोड्यांच्या ब्रेकअप, डिवोर्सच्या चर्चा होत असतात. बिग बॉस १९ विजेता गौरव खन्ना आणि पत्नीचं बिनसल्याची चर्चा होती. आता आणखी एका कपलच्या ब्रेकअपची बातमी आली आहे.
2 / 8
राईज अँड फॉल शो आठवतोय? धनश्री वर्मा, कीकू शारदा, अरबाज पटेल, अर्जुन बिजलानी, कुब्रा सैत असे काही सेलिब्रिटी शोमध्ये दिसले होते.
3 / 8
याच शोमधील एका सेलिब्रिटीचा बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला आहे. तिने सोशल मीडियावर थेट ब्रेकअप झाल्याचं स्पष्टच लिहिलं आहे. कोण आहे ती?
4 / 8
तर ही आहे अक्रिती नेगी. 'रोडीज', 'स्प्लिटव्हिला' अशा रिएलिटी शोमध्ये अक्रिती दिसली आहे. गेल्या वर्षी ती 'राइज अँड फॉल'मध्ये झळकली.
5 / 8
अंशुमत श्रीवास्तवसोबत अक्रिती रिलेशनशिपमध्ये होती. शोमध्ये अंशुमतही आला तेव्हा या क्युट जोडीने प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं होतं. ज्याप्रकारे अंशुमतने अक्रितीला पाठिंबा दिला त्याचं चाहत्यांन कौतुक केलं होतं.
6 / 8
मात्र आता चाहत्यांच्या या फेवरेट कपलने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चाहत्यांना धक्काच बसला आहे. अक्रितीनेच सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ही बातमी दिली आहे.
7 / 8
'अंशुमत आणि मी आता एकत्र नाही आहोत. आम्ही आदरपूर्वक एकमेकांपासून वेगळे होत आहोत. कृपया सर्वांनी आम्हाला प्रायव्हसी द्यावी ही विनंती.' असे तिने लिहिले.
8 / 8
या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या ब्रेकअपचं कारण नक्की काय असं चाहते विचारत आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकाररिलेशनशिपसोशल मीडिया