By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:32 IST
1 / 9'रात्रीस खेळ चाले' ही मालिका झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक. या मालिकेने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. 2 / 9कोकणातील नाईक वाड्याची हॉरर गोष्ट सांगणारी 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. 3 / 9या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता याबरोबरच पांडूचं पात्रही प्रचंड गाजलं होतं. पांडूच्या 'विसरलंय'ने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 4 / 9पण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेनंतर पांडू कुठेच दिसला नाही. मग तो कुठे गायब झाला? आता तो काय करतो? हे तुम्हाला माहितीये का? 5 / 9'रात्रीस खेळ चाले' मालिकेत पांडूची भूमिका अभिनेता प्रल्हाद कुडतरकर याने साकारली होती. 6 / 9या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली होती. पण, आता प्रल्हाद अभिनय करताना दिसत नाही. 7 / 9खरं तर पडद्यावर प्रल्हाद दिसत नसला तरी तो कलाविश्वात सक्रिय आहे. प्रल्हाद अभिनेता असण्यासोबतच एक लेखकही आहे. 8 / 9अनेक मालिकांच्या संवाद लेखनाची जबाबदारी त्याने पेलली आहे. सध्या तो तारिणी मालिकेचं संवाद लेखन करतो. 9 / 9'कुर्ला टू वेंगुर्ला' सिनेमातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. प्रल्हादचं लग्न झालं असून तो पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.