Join us

"तो मला जबरदस्तीने खेचत जंगलात घेऊन गेला, मी किंचाळत होते आणि लोक बघत राहिले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:24 IST

1 / 9
'अगले जनम मोहे बिटिया ना कीजो' हा टीव्हीवरचा एक टॉप शो होता. या मालिकेतील अभिनेत्री रतन राजपूतने आपल्या अभिनयाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आणि ती लोकप्रिय झाली.
2 / 9
रतन राजपूतला ही सीरियल संपल्यानंतर कोणतं दुसरं काम मिळालं नाही. त्यामुळे ती आपल्या गावाला शिफ्ट झाली.
3 / 9
गावाला राहत असताना अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने तिला जबरदस्तीने खेचत जंगलात नेलं आणि तिचं तोंड दाबलं. ती त्यावेळी खूप किंचाळत राहिली.
4 / 9
मंडी हाऊसमध्ये एक्टिंगच्या क्लासला जात असताना तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. एक जण तिचा पाठलाग करत होता आणि नंतर त्याने तिला मागून येऊन पकडलं.
5 / 9
'हात पकडला आणि मला जंगलात घेऊन जात होता. तुला फोन देतो असं सांगत होता. मी याच्यापासून वाचेन की नाही असा प्रश्न मला पडला. मी किंचाळत होते आणि लोक पाहत राहिले.'
6 / 9
'एका विद्यार्थ्याने त्यावेळून माझी मदत केली आणि मला सुखरुप घरी पोहोचवलं. माझ्यासोबत असं घडल्याने मी घाबरली होती' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
7 / 9
रतन राजपूतने महाभारतमध्ये देखील काम केलं आहे. आता ती इंडस्ट्रीपासून दूर असून आपल्या गावी राहत आहे.
8 / 9
सोशल मीडियावर अभिनेत्री एक्टिव्ह असून ती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते.
9 / 9
टॅग्स :टिव्ही कलाकार