1 / 9Raja Shivaji Movie: रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा अखेर १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात मराठी आणि बॉलिवूड कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते.2 / 9'राजा शिवाजी'मध्ये लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री दिशा परदेशीनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दिशा परदेशी या सिनेमात अफजलखानची बेगम या व्यक्तिरेखेत आहे. 3 / 9या सिनेमात तिला संजय दत्त, बोमन इराणी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे. 4 / 9दिशाने 'राजा शिवाजी'च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ती म्हणते, 'काही प्रवास फक्त तुमचा मार्ग बदलत नाहीत… ते तुमचा आत्माच बदलून टाकतात'. 5 / 9'राजा शिवाजीचा भाग होणं आणि अफजलची बेगम साकारण्याची संधी मिळणं, हा माझ्यासाठी एक असा आशीर्वाद आहे, ज्यासाठी मी कदाचित तयारही नव्हते'.6 / 9'सेटवर अनेकदा मी थांबले आणि स्वतःलाच विचारले “हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? हे सगळं अजूनही स्वप्नासारखंच वाटतं… आणि हे स्वप्न मला कधीच संपवायचं नाहीये'. 7 / 9'माझ्या मनात अपार कृतज्ञता आहे. या विश्वाबद्दल, या संधीबद्दल आणि अशा एका चित्रपटाचा भाग होण्याबद्दल…जो मराठी सिनेमाच्या इतिहासाला नव्याने लिहिणार आहे'.8 / 9'एका अनिश्चित टप्प्यानंतर प्रेम पुन्हा माझ्याकडे आलं. या चित्रपटाच्या रूपात, या पात्राच्या रूपात, आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातून. तुमचा प्रत्येक मेसेज, प्रत्येक शुभेच्छा, मी मनापासून अनुभवते'.9 / 9'आज मी इथे उभी आहे. फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एक अशी व्यक्ती म्हणून जी खूपच भारावलेली, नम्र आणि मनापासून कृतज्ञ आहे. अफजलची बेगम… कायम माझ्या हृदयाचा एक भाग राहील'.