Join us

राहुल वैद्य आणि दिशानं लेकीचा वाढदिवस दणक्यात साजरा केला, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 16:58 IST

1 / 10
अभिनेता राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार ही जोडी कायमच चर्चेत असते. दोघांचीही जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
2 / 10
राहुल आणि दिशा सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतात.
3 / 10
नुकतंच राहुल आणि दिशा यांनी त्याची लाडकी लेक नव्या वैद्य हिचा दुसरा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला.
4 / 10
राहुल आणि दिशाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
5 / 10
गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस आणि दोन वेण्यांमध्ये छोटी नव्या खूपच गोंडस दिसत होती.
6 / 10
त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत नव्या वाढदिवस साजरा केला.
7 / 10
२० सप्टेंबर रोजी नव्या दोन वर्षांची झाली आहे. नव्याचा वाढदिवसाचा केकही खूप आकर्षक होता.
8 / 10
दिशा आणि राहुलने त्यांच्या मुलीसोबत विविध पोझमध्ये फोटो काढले आहेत.
9 / 10
या फोटोंमध्ये दिशा ऑलिव्ह ग्रीन' ड्रेसमध्ये अगदी सुंदर दिसत आहे.
10 / 10
राहुल आणि दिशा लग्नापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. राहुल जेव्हा 'बिग बॉस १४' मध्ये होता तेव्हा त्याने दिशाला प्रपोज केले होते. दोघांनी १६ जुलै २०२१ रोजी लग्न केले. मुंबईमध्ये अत्यंत शाही पद्धतीने राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा विवाहसोहळा पार पडला. अनेक मोठे कलाकार या लग्नसोहळ्यास उपस्थित होते.
टॅग्स :राहुल वैद्यटिव्ही कलाकारसेलिब्रिटी