Join us

दिसायला सुंदर, पडद्यावर साकारली खलनायिका; असा होता प्रिया मराठेचा कलाविश्वातील प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:54 IST

1 / 7
मराठी तसंच हिंदी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झालं. अचानक आलेल्या या बातमीनंतर संपूर्ण कलाविश्वावर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
2 / 7
दिसायला सुंदर पण पडद्यावर खलनायिका म्हणून ती प्रसिद्ध झाली. 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे तिला हिंदीतही ओळख मिळाली. प्रियाची मनोरंजनसृष्टीत नेमकी कशी सुरुवात झाली वाचा
3 / 7
प्रिया मराठे हे नाव सर्वांच्याच परिचयाचं आहे. २००५ साली आलेली 'या सुखांनो या' ही मराठीतली गाजलेली मालिका. या मालिकेत प्रियाही होती. पावनी अधिकारी ही तिची भूमिका होती. या मालिकेतूनच प्रियाने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं.
4 / 7
यानंतर प्रियाने मराठीतच गाजलेल्या 'चार दिवस सासूचे'मध्येही काम केलं. नंतर तिने 'कसम से' या मालिकेतून हिंदीत पदार्पण केलं. यामध्ये ती विद्या बालीच्या भूमिकेत दिसली.
5 / 7
'पवित्र रिश्ता'मध्ये वर्षा या भूमिकेने तिला आणखी ओळख मिळाली. 'बडे अच्छे लगते है' मालिकेतही ती काही काळासाठी होती. शिवाय 'साथ निभाना साथिया' या हिंदी मालिकेतही तिची भूमिका होती. यामध्येही ती खलनायिकाच होती.
6 / 7
नंतर प्रिया पुन्हा 'तू तिथे मी' या मराठी मालिकेत झळकली. यातली खलनायिका प्रिया मोहिते प्रचंड गाजली. या मालिकेने तिला पुन्हा मराठी कलाविश्वात लोकप्रियता मिळवून दिली.
7 / 7
'तुझेच मी गीत गात आहे' ही प्रियाची शेवटची मालिका ठरली. तसंच त्याआझी 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतही तिने काम केलं होतं. या मालिकांदरम्यान प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती. ती बरीही होत होती. मात्र मध्येत पुन्हा तिचा त्रास उफाळून आला आणि अखेर ती झुंज हरली.
टॅग्स :प्रिया मराठेमराठी अभिनेतामृत्यू