By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 09:01 IST
1 / 10प्राजक्ता माळी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 2 / 10प्राजक्ता सोशल मीडियावरुन चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स देत असते. 3 / 10प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. 4 / 10एका चाहत्याने प्राजक्ताला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. 'नॅशनल प्रश्न...लग्न कधी करणार?' असा प्रश्न चाहत्याने प्राजक्ताला विचारला. 5 / 10खाजगी प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला प्राजक्ताने जशास तसं उत्तर दिलं. 6 / 10'हा माझ्या आईवडिलांचा प्रश्न आहे...तुझा नाही', असं प्राजक्ता चाहत्याला म्हणाली.7 / 10३६ वर्षीय प्राजक्ता अजूनही अविवाहित आहे. प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 8 / 10जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्राचं सूत्रसंचालन करत आहे. 9 / 10अलिकडेच प्रदर्शित झालेल्या देवखेळ वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. 10 / 10प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच एक बिजनेस वुमनही आहे. तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड आणि निर्मिती संस्था आहे.